
अमेरिका , इस्त्रायल आणि इराणमधील तणाव वाढला आहे. मोठ्या क्षेपणास्त्रांनी हल्ले केली जात आहेत. हेच नाही तर थेट इराणने अमेरिकेचा बदला घेण्यासाठी ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्यावर हल्ला करण्यास सुरूवात केली. इस्त्रायलवर सतत मिसाईलचा मारा सुरू आहे. अमेरिका इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर विमानसेवा पूर्णपणे बंद आहे. दुबई विमानतळावर अनेकजण अडकून पडले आहेत. मध्य पूर्ण आशियात या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली. अमेरिका इराण युद्धाचा भडका उडाला आहे. जवळपास 8 देशांमध्ये मोठे हल्ले इराणकडून करण्यात आली. ज्या ज्या देशात अमेरिकेचा लष्कर तळ आहे, त्याला इराण टार्गेट करत आहे. तेहरानमध्ये असंख्य हवाई हल्ले इस्त्रायल आणि अमेरिकेकडून केली जात आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांना अमेरिकेकडून ठार करण्यात आले.
आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर तणाव प्रचंड वाढला. काल पाकिस्तानमध्ये स्थिती गंभीर होती. राचीसह इस्लामाबादलच्या अमेरिकन दूतावास कार्यालयाला लोकांकडून टार्गेट करण्यात आले. अमेरिकन दूतावास कार्यालय जाळण्यात आले. मोठी तोडफोड करण्यात आली. यानंतर पोलिसांनी गोळीबार केला आणि तब्बल 10 जण ठार झाले.
श्रीनगरमध्येही आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर लोक रस्त्यावर जमताना दिसले. लेहमध्येही लोक मोठ्या संख्येने जमले होते. मात्र, अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता भारतात अलर्ट जारी करण्यात आला. केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहिले आहे. हिंसाचाराबाबत हे पत्र लिहिण्यात आले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनानंतर काही राज्यात लोक रस्त्यावर उतरले होते आणि विरोध दर्शवत होते.
या पत्रात भडकाऊ भाषण देणाऱ्या इराणी समर्थकांवर लक्ष ठेवणे आणि अशाप्रकारे भाषणे रोखण्याबाबत पत्रात लिहिण्यात आले. काल दिल्लीमध्ये एक महत्वाची बैठकही पार पडली. देशात कोणत्याही हिंसा होणार नाहीत, याकडे लक्ष देण्याबाबत यामध्ये लिहिण्यात आले. आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्युनंतर पाकिस्तानमध्ये मोठी हिंसा भडकली होती. आता केंद्रीय गुप्तचर विभागाचे या गोष्टींवर बारीक नजर आहे.