AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत ‘या’ लसीमुळे साईड इफेक्ट?, वाचा नेमकं काय घडलं?

मॉडर्ना लस घेतल्यांनतर एका डॉक्टरला गंभीर अ‌ॅलर्जी झाल्याचा प्रकार घडला आहे. (america Moderna vaccine allergy)

अमेरिकेत 'या' लसीमुळे साईड इफेक्ट?, वाचा नेमकं काय घडलं?
| Updated on: Dec 26, 2020 | 4:00 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना थोपवण्यासाठी आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत अमेरिकेत समूहाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येतोय. मात्र, मॉडर्ना लस घेतल्यांनतर एका डॉक्टरला गंभीर अ‌ॅलर्जी झाल्याचा प्रकार घडला आहे. (allergy on body of the patient in america by Moderna vaccine)

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील फुड अँड ड्रग्स अ‌ॅडमिनिस्ट्रेशन (FDA) तर्फे मॉडर्ना या कंपनीने निर्माण केलेली लस सामन्यांना देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीअंतर्गत अमेरिकेत समूहाने लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातोय. याच लसीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत बोस्टन येथील एका डॉक्टरने गुरुवारी ही लस घेतली. मात्र, लस घेताच या डॉक्टरला अ‌ॅलर्जी झाल्याचा प्रकार घडला.

डॉक्टरला काय त्रास जाणवला?

मिळालेल्या माहितीनुसार अ‌ॅलर्जी झालेले डॉक्टर बोस्टन मेडिकल सेंटरमध्ये नोकरीवर आहेत. त्यांचं नाव डॉ. हुसेन सदरजादे असे आहे. मॉडर्ना लस घेतल्यानंतर त्यांच्या छातीत जोराने धडधडायला लागलं. तसेच, चक्कर आल्यासारखे वाटू लागल्याने त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. परवानगी दिल्यानंतर या लसीमुळे साईड इफेक्ट झाल्याची अमेरिकेतील ही पहिलीच घटना आहे. यामुळे अमेरिकेत सध्या खळबळ उडाली आहे.

बोस्टन मेडिकल सेंटरच्या प्रवक्त्यांकडून दुजोरा

डॉ. सरदजादे यांना झालेल्या साईड ईफेक्ट्सबद्दल बोस्टन मेडिकल सेंटरच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला. याबाबत अधिक सांगताना त्यांनी डॉ. सरदजादे यांच्या शरीरावर अ‌ॅलर्जी झाल्याचे मान्य केले. तसेच, लक्षणं जाणवू लागण्यानंतर इमरजन्सी केस म्हणून त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मेडिकल सेंटरच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. हुसैन सरदजादे यांची प्रकृती सध्या चांगली आहे.

मॉडर्नाला आठवडाभरापूर्वी मंजुरी

मागील आठवड्यात 18 डिसेंबर रोजी अमेरिकेच्या फुड अँड ड्रग्स अ‌ॅडमिनिस्ट्रेशनने मॉडर्ना लस नागरिकांना देण्यास मान्यता दिली. यावेळी त्यांनी, मॉडर्ना लसीमुळे साईड ईफेक्ट कमी आणि फायदे जास्त असल्याचं सांगितलं होतं. एफडीए विभागाने मॉडर्ना लसीच्या वापराला 20-00 अशा मताने मंजुरी दिली होती. त्यांनतर हा साईड ईफेक्ट झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाशी लढाई जिंकता-जिंकता नाताळमध्ये अचानक रुग्ण वाढले, दक्षिण कोरियात नेमकं काय झालं?

New Strain of Coronavirus UK : कोरोनाचा नवा अवतार आशियात धडकला, पहिला रुग्ण सापडला

(allergy on body of the patient in america by Moderna vaccine)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.