कोरोनाशी लढाई जिंकता-जिंकता नाताळमध्ये अचानक रुग्ण वाढले, दक्षिण कोरियात नेमकं काय झालं?

दक्षिण कोरिया काहीच दिवसात कोरोनाला हरवणार असं वाटत होतं. मात्र, नाताळच्या आठवड्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.

कोरोनाशी लढाई जिंकता-जिंकता नाताळमध्ये अचानक रुग्ण वाढले, दक्षिण कोरियात नेमकं काय झालं?

सोल (Seoul) : दक्षिण कोरियात (South Korea) शनिवारी कोरोनाचे 1,132 नवे रुग्ण आढळून आले (New Corona Cases In South Korea). तर शुक्रवारी 1,241 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. येथे आतापर्यंत एकूण 55,902 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण कोरियात गेल्या 15 दिवसांमध्ये तब्बल 15,000 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं. या कालावधीत 221 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला. त्यामुळे आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ही 793 वर पोहोचली आहे (New Corona Cases In South Korea).

दक्षिण कोरिया काहीच दिवसात कोरोनाला हरवणार असं वाटत होतं. मात्र, नाताळच्या आठवड्यात अचानक कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे आता सोशल डिस्टन्सिंगसोबतच इतर नियमही अधिक कठोर करण्याची गरज असल्याचं चित्र इथे आहे. देशात कोरोना रुग्णांच्या उपचारासठी अनेक संस्थांची निवड करण्यात आली आहे. तसेच, अनेक रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी आणखी आयसीयू बेड्सची सुविधा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध संस्थेचे डॉ. क्वाक जिन यांनी सांगितलं की, या महिन्यात कमीत कमी चार रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत प्राण सोडले. संस्थेने सांगितलं की 16,577 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 299 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. कोरिया युनिव्हर्सिटी अनसान रुग्णालयातील संसर्गजन्य रोगांचे विशेषज्ज्ञ चो वून सूक यांनी सांगितलं की, हिवाळ्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढण्याचया पार्श्वभूमीवर आणखी तयारी करावी लागेल (New Corona Cases In South Korea).

लस आली पण कोरोनाशी लढाई अजूनही सुरुच

कोरोनावरील लस आल्यानंतर त्याच्याशी लढणे अधिक सोपं होईल असं मानलं जात होतं. मात्र, यादरम्यान ब्रिटन आणि दक्षिण आफ्रीकेमध्ये कोरोनाचा नवा अवतार समोर आला. ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिअंट पुढे आल्यानंतर अनेक देशांनी युकेहून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांवर बंदी लावली. ब्रिटननेही गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रीकेतून येणाऱ्या विमानांवर बंदी लावली.

फायझर-बायोएनटेकच्या लशीला सर्वात आधी ब्रिटनने परवानगी देत लसीकरणाला सुरुवात केली होती. सध्या अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये अमेरिकेच्या दोन कंपन्यांनी फाइजर-बायोएनटेक आणि मॉडर्नासोबत लसीकरणाला सुरुवात केली आहे.

New Corona Cases In South Korea

संबंधित बातम्या :

Special Report | अमेरिकन कंपनी मॉडर्नाला विश्वास, नव्या विषाणूवर प्रभावशाली?

लस येण्यापूर्वीच चिनी हॅकर्सचा डोळा; बनावट लसीची भीती, मुंबई पोलीस सतर्क

विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI