
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे, पावसाळी अधिवेशनात गेले दोन दिवस ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर मोठी कारवाई केली, भारतानं पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली, भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
दरम्यान त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु भारतानं हा हल्ला यशस्वीरित्या परतून लावला आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून पुन्हा एकदा पाकिस्तानच्या एअर बेसवर हल्ले करण्यात आले, दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. त्यानंतर दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, दरम्यान युद्धविराम हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा मुद्दा अधिवेशनात गाजत असतानाचा आता ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प यांनी भारतासंदर्भात एक ट्विट केलं आहे, या ट्विटमध्ये त्यांनी भारताबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
‘भारत हा आपला मित्र देश असला तरी देखील आपण त्यांच्याशी तुलनेनं कमी व्यावसाय केला आहे. कारण त्यांचे आयात शुल्क जगातील सर्वात जास्त आहे, भारतानं त्यांचं बहुतांश लष्करी साहित्य हे रशियाकडून खरेदी केलं आहे, तसेच भारत रशियाचा सर्वात मोठा ऊर्जा खरेदीदार देश आहे. येत्या एक ऑगस्टपासून या नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, दोन्ही देशांमध्ये सर्व काही ठीक नाही’ असं मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. मात्र दुसरीकडे ट्रम्प हे सर्व फक्त दबाव टाकण्यासाठी करत आहेत, ते आपला निर्णय मागे घेतील असं मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जातं जाहे.