AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harpoon Missile : शत्रू देशांना धडकी, भारताला अमेरिकेकडून ‘हार्पून मिसाईल’ मिळणार, हिंद-प्रशांत महासागरात दबदबा

अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार 8 कोटी 20 लाख डॉलरचा असेल (Harpoon Joint Common Test Set).

Harpoon Missile : शत्रू देशांना धडकी, भारताला अमेरिकेकडून ‘हार्पून मिसाईल’ मिळणार, हिंद-प्रशांत महासागरात दबदबा
| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 7:20 AM
Share

Harpoon Missile वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार 8 कोटी 20 लाख डॉलरचा असेल (Harpoon Joint Common Test Set). या निर्णयामुळे भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध तर मजबूत होणारच आहेत. सोबत शत्रू देशांनाही धडकी भरणार आहे. भारताकडे हार्पून मिसाईल आल्यानं हिंद आणि प्रशांत महासागरात भारताचा दबदबा वाढणार आहे. यामुळे समुद्री सीमांचं संरक्षण करण्यात भारत आणखी समर्थ होईल. अमेरिकेने स्वतः या निर्णयाची माहिती दिलीय.

अमेरिकेने म्हटलं आहे, “‘डिफेंस सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने सोमवारी (2 ऑगस्ट) या संबंधी अमेरिकेच्या संसदेला अधिसूचित करण्यात आलंय. हार्पून एक जहाज विरोधी क्षेपणास्त्र आहे. भारताने एक जेसीटीएस खरेदी करण्याबाबत विचारणा केली होती. यात एक ‘हार्पून इंटरमीडिएट लेव्हल’ देखरेख स्टेशन, सुटे भाग आणि दुरुस्ती, परीक्षण संबंधी उपकरण, प्रक्षेपण आणि तांत्रिक दस्तावेजीकरण, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, अमेरिका सरकार आणि ठेकेदाराकडून तांत्रिक , इंजीनियरिंग आणि इतर मदत सेवा या मुद्द्यांचा समावेश आहे.”

हिंद-प्रशांत महासागरात भारताची ताकद वाढणार, शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका

या क्षेपणास्त्राची अंदाजे किंमत 8 कोटी 20 लाख डॉलर आहे. डीएससीएने म्हटलं, “या प्रस्तावित विक्रीमुळे भारतीय-अमेरिकेतील संबंधांत सुधारणा होईल. तसेच एका मोठ्या संरक्षण भागीदाराची सुरक्षा वाढवण्यात मदत करुन अमेरिका आपली परदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करेल (Harpoon Missile US). भारत हिंद-प्रशांत आणि दक्षिण आशिया क्षेत्रात राजनैतिक स्थिरता, शांतता आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाची शक्ती आहे.”

हेही वाचा :

RS Virus : कोरोना संकटात आता अमेरिकेत RS विषाणूची धडक, मुलांमध्ये वेगाने प्रादुर्भाव, जाणून घ्या लक्षणं

कल्याणकर संजलची ‘उत्तुंग झेप’; अमेरिकेत खासगी अंतराळ यान बनवण्याच्या टीममध्ये पटकावले स्थान

Special Report | चीन खरंच अमेरिका, भारताशी युद्धाच्या तयारीत?

व्हिडीओ पाहा :

America approves sale of Harpoon Missile system to India 82 million dollars deal

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.