India-US Tariff Tension : रशियाकडून तेल खरेदी करण्यात अमेरिकेला प्रॉब्लेम आहे, म्हणून आता भारताने घेतला एक मोठा निर्णय
India-US Tariff Tension : आपली भूमिका ही नेहमीच तटस्थ, निपक्षपातीपणाची असते, हे भारताने पुन्हा एकदा सिद्ध केलय. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो, म्हणून अमेरिकेला आक्षेप आहे. त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. म्हणून आता भारताने असा एक निर्णय घेतलाय, त्यातून अमेरिकेशी सुद्धा दुजाभाव केलेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावून धमकावलं, म्हणून भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवलेली नाही. पण म्हणून अमेरिकेशी सुद्धा दुजाभाव केलेला नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली आहे. त्याचवेळी भारताची भूमिका ही नेहमीच तटस्थ, निपक्षपातीपणाची असते. हे भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवून दाखवून दिलय. कंपटेटिव किमतींमुळे भारतीय रिफायनरीजने या महिन्यात अमेरिकेकडून कच्चा तेलाची खरेदी वाढवली आहे. भारताच्या या निर्णयामुळे अमेरिकेकडून व्यापारी तुटीचा जो मुद्दा उपस्थित केला जातो, ती तूट काही प्रमाणात कमी होईल. सध्या भारत-अमेरिका संबंध टॅरिफच्या मुद्यावरुन ताणले गेले आहेत. भारताने अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवल्यामुळे त्यांचं व्यापार तूट थोडी कमी होईल. आशिया खंडात अमेरिकी कच्चा तेलासाठी आर्बिट्रेज विंडो उघडल्यानंतर भारतीय रिफायनरिजसोबत अन्य आशिया रिफायनरिजने सुद्धा खरेदी वाढवली आहे.
IOC ने 5 मिलियन बॅरल, BPCL ने 2 मिलियन बॅरल आणि रिलायन्सने भी विटोलकडून मिलियन बॅरल तेल विकत घेतलं. युरोपियन व्यापारी गनवोर, इक्विनोर आणि मर्कुरिया यांनी सुद्धा भारतीय कंपन्यांना तेल विकलं. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे BPCL ने नायजेरियाच्या यूटापेट क्रूडकडून पहिल्यांदा तेल विकत घेतलय. तेल भंडारात नवीन ग्रेड समाविष्ट करण्यासाठी ही तेल खरेदी केलीय. यातून दिसून येतं की, भारत आपली कच्चा तेलाची गरज भागवण्यासाठी विविध देशांकडून तेल खरेदी करतोय.
स्वस्त तेल खरेदीवर भारताचा सर्व फोकस
स्वस्त किंमती आणि अमेरिकेसोबत व्यापारी संबंध सुधारावेत म्हणून भारतीय रिफायनरीजनी आता रशियासोबत अमेरिकी तेलावर सुद्धा लक्ष केंद्रीत केलय. स्वस्त तेल खरेदीवर भारताचा सर्व फोकस आहे.
सर्वात जास्त वाटा कोणाचा?
भारताने जून तिमाहीत अमेरिकेकडून क्रूड ऑईल खरेदी वाढवली आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेत भारताची अमेरिकेकडून तेल आयात जवळपास 114 टक्क्यांना वाढली आहे. जून महिन्यात भारताने डेली 4.55 मिलियन बॅरल कच्च तेल मागवलं. यात रशियाचा वाटा सर्वात जास्त आहे. त्यानंतर अमेरिकेने 8 टक्क्यासह आपली भूमिका बजावली.
