Trade Deal : बाप बाप होता है! अमेरिकेचा पाकिस्तानला जबर धक्का, भारतासाठी सर्वात आनंदाची बातमी

भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक व्यापार करार झाला आहे. या व्यापार करारानंतर आता अमेरिकेने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना जबर धक्का दिला आहे.

Trade Deal : बाप बाप होता है! अमेरिकेचा पाकिस्तानला जबर धक्का, भारतासाठी सर्वात आनंदाची बातमी
donald trump and narendra modi and shahbaz sharif
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 07, 2026 | 3:45 PM

America Released Indian Flag : भारत आणि अमेरिका यांच्यात ऐतिहासिक असा व्यापार करार झाला आहे. या व्यापार करारामुळे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार वाढणार आहे. सोबतच या करारामुळे अमेरिकेलाही मोठा आर्थिक फायदा होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेला हा व्यापार करार होताच अमेरिकेने भारतावरील टॅरिफ कमी केला आहे. सोबतच भारताचा एक नकाशा शेअर केला आहे. या करारामुळे अमेरिकेला कोणकोणता फायदा होईल, याबाबतची माहिती या नकाशात देण्यात आली आहे. अमेरिकेने सार्वजनिक केलेला भारताचा हाच नकाशा आता पाकिस्तानसाठी मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे. कारण अमेरिकेने जारी केलेल्या भारताच्या नकाशात जम्मू-काश्मीर तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे दाखवण्यात आले आहे. या नकाशामुळे आता पाकिस्तानाची एका प्रकार झोपच उडाल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानसोबतच चीनलाही मोठा धक्का

अमेरिकेने अधिकृतरित्या एक नकाशा जारी केला आहे. या नकाशात जम्मू-काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या नकाशात दाखवण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अक्साई चीन हा आमचाच प्रदेश आहे, असा दावा चीनकडून केला जातो. हा प्रदेशदेखील अमेरिकेने भारताचाच भाग असल्याचे अमेरिकेने एका प्रकारे जारी केलेल्या नकाशातून जगाला सांगितले आहे. म्हणूनच भारत-अमेरिकेसोबतचा व्यापार करार आणि या व्यापार करारामुळे अमेरिकेने जारी केलेला भारताचा नकाशा हा पाकिस्तानसोबच चीनलाही मोठा फटका असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानने प्रयत्न केले पण शेवटी अपयशच

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान हा देश आपले अमेरिकेसोबतचे संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न करत आहे. त्यासाठी पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख आसीम मुनीर तसेच पाकिस्तानचे पंतप्रधाना शाहबाज शरीफ यांनी अनेकदा अमेरिका वारी केली आहे. सोबतच अमेरिकेने पाकिस्तानात गुंतवणूक करावी म्हणून अनेक सवलती देऊ केल्या आहेत. ही राजकीय खेळी खेळून भारताला शह देण्याचाही पाकिस्तानचा प्रयत्न आहे. परंतु आता भारत-अमेरिका व्यापार करारामुळे अमेरिकेने जारी केलेला नकाशा हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच आता पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.