AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-US Trade Deal:धन्यवाद, डोनाल्ड ट्रम्प, भारत-अमेरिकेतील व्यापार करारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, ‘मेक इन इंडिया’बाबत मोठे भाष्य

India-US Trade Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करारावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सर्वात अगोदर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहे. तर मेक इन इंडिया या महत्त्वकांक्षी योजनेविषयी मोठे भाष्य केले आहे.

India-US Trade Deal:धन्यवाद, डोनाल्ड ट्रम्प, भारत-अमेरिकेतील व्यापार करारावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, 'मेक इन इंडिया'बाबत मोठे भाष्य
नरेंद्र मोदी-डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 07, 2026 | 12:07 PM
Share

PM Narendra Modi Thanks to Donald Trump: अमेरिका आणि भारत या देशांमधील तणाव निवळला आहे. अमेरिकेने भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवला आहे. तर 7 टक्के टॅरिफ कमी केला आहे. आता भारतावर 18 टक्के व्यापारी शुल्क आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्रेड डीलवर आनंद व्यक्त केला आहे. हा करार दोन्ही देशांमधील वाढता विश्वास, मजबूत भागीदारीचे प्रतिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. त्यांनी भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला.

मेक इन इंडियाला मिळेल मजबूती- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारामुळे मेक इन इंडिया या महत्त्वकांक्षी मोहिमेला नवीन झळाळी मिळेल आणि ही मोहीम अधिक दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.या व्यापारी करारामुळे शेतकरी, उद्योजक, MSME क्षेत्र, स्टार्टअप इनोव्हेटर्स, मच्छीमारांसह इतर अनेक क्षेत्रासाठी नवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर महिला आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत आणि अमेरिकेत विश्वासार्हय पुरवठा साखळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यानुसार, या नवीन व्यापारी करारामुळे भारत आणि अमेरिकेत विश्वासर्हय पुरवठा साखळी तयार होईल. गुंतवणूक आणि तंत्रज्ञानात दोन्ही देशांमध्ये दृढ संबंध तयार होतील. विकसीत भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी या करारावर मोठे भाष्य केले आहे. भारत आणि अमेरिकेतील अंतिरम व्यापारी कराराचा निर्यातदारांना मोठा फायदा होईल. खास करून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना, शेतकरी आणि मच्छीमारांसाठी 30,000 अब्ज डॉलरची बाजारपेठ उपलब्ध होईल असे त्यांनी स्पष्ट केले. निर्यात वाढल्याने भारतीय महिला आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल. लाखो नवीन रोजगार उपलब्ध होतील असा दावा गोयल यांनी केला.

संयुक्त निवेदनात काय?

यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच भारतासोबतच्या अंतरिम व्यापार कराराची घोषणा केली. त्यातंर्गत अमेरिका आणि भारतावरील शुल्क कमी करून 18 टक्के करण्यात आले आहे. भारत आणि अमेरिकेने याविषयीचे संयुक्त निवेदन सादर केले. 13 फेब्रुवारी, 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अमेरिका आणि भारत यांच्यात द्विपक्षीय व्यापारी करारावर चर्चा झाली आणि रुपरेषा ठरवण्यात आली होती. पण मध्यंतरी रशियाकडून इंधन खरेदीने मोठा पेच निर्माण झाला. ऑगस्ट 2025 मध्ये भारतावर ट्रम्प यांनी 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर वातावरण निवळले आणि आता व्यापारी करार झाल्याचे जाहीर करण्यात आले.

Follow Us
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा
धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता इमारतीत राहणार धारावीकर
Video : धारावीच्या नव्या घरांचा व्हिडिओ समोर, आता झोपडपट्टी नाही तर, इमारतीत राहणार धारावीकर
'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी
Prashant Ambi : कोणता जिहादी मदत करतो.., 'शिवाजी कोण होता' पुस्तकाच्या प्रकाशकाची पोलिसांकडून चौकशी; संजय गायकवाडांच्या आरोपांनंतर खळबळ
महिलांवर दबाव असल्याने त्या..., संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
Video : महिलांवर दबाव असल्याने त्या..., श्वेता महालेंचे संजय गायकवाडांवर गंभीर आरोप
नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक
Dharashiv Farmer : नापिकी अन् कर्जाचा डोंगर; शेतकऱ्याने जीवन संपवलं, मृतदेह घेऊन नातेवाईक थेट...
आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; दीपकेंबद्दल नार्वेकर स्पष्टच बोलले
Rahul Narvekar : आंदोलन करून राजीनामा घेणं हे..; अभिजीत दीपकेंबद्दल राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम