Facebook Live : आधी प्रेयसी मग पत्नी, पाहा अमेरिकेतल्या माथेफिरून कशी केली हत्या

| Updated on: Dec 14, 2021 | 3:47 PM

एका माथेफिरूनं आपल्या मैत्रिणी(Ex-Girlfriend Murder)ची गोळ्या घालून हत्या केलीय. अमेरिकेतल्या बाल्टिमोर (Baltimore) या ठिकाणी हा प्रकार घडलाय. त्यानं पूर्वाश्रमीची मैत्रिण तारा लबॉन्ग(Tara Labang) आणि त्याची आधीची पत्नी वेंडी ब्लॅक (Wendy Black) गोळ्या झाडून हत्या केली.

Facebook Live : आधी प्रेयसी मग पत्नी, पाहा अमेरिकेतल्या माथेफिरून कशी केली हत्या
वेंडी ब्लॅक/तारा लबॉन्ग
Follow us on

वॉशिंग्टन : एका माथेफिरूनं आपल्या मैत्रिणी(Ex-Girlfriend Murder)ची गोळ्या घालून हत्या केलीय. अमेरिकेतल्या बाल्टिमोर (Baltimore) या ठिकाणी हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे या माथेफिरूनं या घटनेचं फेसबुक लाइव्ह(Facebook Live)ही केलं. एवढ्यावरच न थांबता आपल्या आधीच्या पत्नीचीही हत्या त्यानं केली आणि शेवटी आत्महत्या केली. यादरम्यान तो संपूर्ण वेळ फेसबुकवर लाइव्ह होता.

फेसबुक लाइव्ह
एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बाल्टिमोरचा रहिवासी 44 वर्षीय जे ब्लॅक यानं शनिवारी गरोदर असलेल्या त्याच्या पूर्वाश्रमीची मैत्रिण तारा लबॉन्ग(Tara Labang) आणि त्याची आधीची पत्नी वेंडी ब्लॅक (Wendy Black) गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर त्यानं आत्महत्या केली. ही घटना घडतेवेळी तो फेसबुकवर लाइव्ह आला होता, ही हत्या कशी करणार हे तो यात सांगत होता.

‘आता पत्नीचा नंबर’
फेसबुक लाइव्ह दरम्यान, जे ब्लॅक म्हणतो, ‘मी नुकतीच माझ्या माजी मैत्रिणीच्या डोक्यात गोळी झाडली, ते स्वप्नवत होतं. आता पुढचा नंबर माझ्या आधीच्या पत्नीचा आहे आणि मग मीसुद्धा आत्महत्या करणार आहे. असे सांगितल्यानंतर, जे आपली पूर्वाश्रमीची पत्नी वेंडी ब्लॅकच्या घरी पोहोचतो, वेंडीनं दरवाजा उघडताच, जेनं तिला गोळ्या घालून ठार केलं. काही वेळानं त्यानं स्वत:वरही गोळी झाडली.

जे ब्लॅक

कौटुंबिक वाद?
या प्रकारानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि वेंडीच्या घरातून तिचा आणि जेचा मृतदेह सापडला. व्हिडिओच्या आधारे पोलीस जेची मैत्रीण तारा लबांग हिच्या घरी पोहोचले तेव्हा तिथं तिचा मृतदेह आढळून आला. ताराच्या डोक्यात गोळी लागली होती.

हिंसाचाराचेही गुन्हे दाखल
जे, वेंडी आणि तारा हे तिघेही रुग्णालयात काम करत असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र काही दिवसांपूर्वी जेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्याला दुसरी नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो नैराश्यात होता. दोन्ही मुलांच्या ताब्याबाबतही त्यांच्यात वाद झाला होता. त्यात हा प्रकार घडला. दरम्यान, त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचेही गुन्हे दाखल आहेत.

Nashik| नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह

किरकिरणाऱ्या 27 दिवसांच्या बाळाचा त्रास, जन्मदात्रीने भिंतीवर डोकं आपटून संपवलं

पंतप्रधान पीक विमा योजना : शेतकऱ्यांना 100 रुपयांच्या प्रीमियमवर किती मिळते नुकसानभरपाई?