Nashik| नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला असून, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका नागरिकाच अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.

Nashik| नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 3:00 PM

नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण सापडला असून, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. आफ्रिकेच्या माली देशातील एका खासगी कंपनीमध्ये काम करणारी ही व्यक्ती आहे. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. आता या रुग्णाचा अहवाल पुण्याच्या NIV लॅबकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या कोरोना चाचण्यात करण्यात येत आहेत.

जिल्ह्यात 330 रुग्ण

नाशिक जिल्ह्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी विद्यार्थ्यांमुळे गजबजल्या आहेत. बहुतांश विद्यार्थी मास्क घालून शाळेत येत आहेत. ज्यांनी मास्क घातला नाही, त्यांना स्वतः गुरुजी मास्क देत आहेत. मात्र, दुसरीकडे शहर आणि जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी मास्क वापरणेच सोडून दिले आहे. त्यामुळे अजूनही जिल्ह्यात कोरोनाच्या 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे प्रशासनाची तूर्तास तरी झोप उडाली आहे.

मालेगावमध्ये 6 रुग्ण

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 859 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत तीनशे तीस रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 28, बागलाण 8, चांदवड 5, देवळा 4, दिंडोरी 11, इगतपुरी 19, कळवण 5, मालेगाव 4, नांदगाव 5, निफाड 36, सिन्नर 22, त्र्यंबकेश्वर 3, येवला 24 अशा एकूण 172 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 141, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 6 तर जिल्ह्याबाहेरील 9 रुग्ण असून, एकूण 330 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 927 रुग्ण आढळून आले आहेत.

असे आहे मृत्यू प्रमाण

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या रुग्णामध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 1, चांदवड 1, कळवण 3, मालेगाव 2, नांदगाव 4, निफाड 4, सिन्नर 2 अशा एकूण 17 पॉझिटीव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.21 टक्के, नाशिक शहरात 98.21 टक्के, मालेगावमध्ये 97.13 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.76 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.80 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 240 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 14, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 738 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

इतर बातम्याः

Nashik| नाशिकमध्ये बिल्डर कोल्हेला बेड्या; आधी मोक्का आता फसवणुकीचा गुन्हा, नेमकं काय प्रकरण…?

Nashik| मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.