AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War News : इस्रायल सोडा, युद्ध काळात अमेरिकेला मोठा झटका देणारा इराणचा दावा, थेट अहंकारावर वार

Iran-Israel War News : इराण-इस्रायलमध्ये सुरु झालेल्या युद्धादरम्यान इराणने एक मोठा दावा केला आहे. हा अमेरिकेसाठी सर्वात मोठा झटका आहे. अमेरिकेच्या अंहकारावर हा वार म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. कारण अमेरिकेला ज्याचा गर्व, अभिमान आहे, त्याच गोष्टीला इराणने धक्का पोहोचवला असेल, तर ते महासत्तेसाठी चांगलं नाही.

Iran-Israel War News : इस्रायल सोडा, युद्ध काळात अमेरिकेला मोठा झटका देणारा इराणचा दावा, थेट अहंकारावर वार
iran-israel war
| Updated on: Jun 14, 2025 | 10:55 AM
Share

इराण-इस्रायलमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाला आहे. इस्रायलने ऑपरेशन रायजिंग लायन अंतर्गत इराणच्या अणवस्त्र आणि सैन्य तळांवर हल्ले केले. त्याला इराणने ‘ट्रू प्रॉमिस 3’ च नाव देत प्रत्युत्तर दिलं. दोन्ही देशामध्ये सुरु असलेल्या या लढाई दरम्यान इराणने एक मोठा दावा केला आहे. एकप्रकारे हा थेट अमेरिकेला झटका आहे. त्यांच्या अंहकारावर वार आहे. इराणने दावा केलाय की, त्यांनी इस्रायली फायटर जेट्स पाडले. महत्त्वाच म्हणजे ही फायटर जेट्स F-35 आहेत. ही जगातील सर्वात अत्याधुनिक फायटर जेट्स मानली जातात. रडारला सुद्धा ही फायटर जेट्स सापडत नाही. F-35 हे जगातलं सर्वात महागड फायटर विमान आहे. इराणने अशी दोन विमानं पाडल्याचा मोठा दावा केला आहे. इराणने F-35 च्या एका पायलटला पकडल्याचा सुद्धा दावा केला आहे.

तेहरान टाइम्सनुसार, हे फायटर जेट इराणच्या एअरस्पेसमध्ये आलं होतं. इराणने हे विमान पाडलं. त्यानंतर पायलट पॅराशूटच्या माध्यमातून खाली उतरला. पायलट खाली उतरताच इराणी अधिकाऱ्यांनी त्याला पकडलं असा तेहरान टाइम्सने दावा केला आहे. इस्रायली डिफेन्स फोर्सेसने त्यांच्याकडे आतापर्यंत अशी कुठलीही माहिती आली नसल्याचा दावा केला आहे.

इस्रायलला पहिल्याच दिवशी 15 अब्ज रुपयांच नुकसान का?

इस्रायली डिफेनस फोर्सने ऑपरेशनबद्दल एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यानुसार, इराणवर हल्ला करण्यासाठी IDF कडून RAAM (F-15I), SOUFA (F-16I) आणि ADIR (F-35I) फायटर जेट्सचा वापर सुरु आहे. इस्रायलने ही सर्व फायटर विमानं अमेरिकेकडून विकत घेतली आहेत. इराण अमेरिकेच जे विमान पाडल्याचा दावा करतोय, त्याच्या एका युनिटची किंमत 7 अब्ज रुपये आहे. म्हणजे इराणच म्हणण खरं निघालं, तर युद्धाच्या पहिल्याच दिवशी इस्रायलचा 15 अब्ज रुपयांच नुकसान सहन कराव लागलय.

एका F-35 विमानाची किंमत किती?

F-35 हे अमेरिकेच पाचव्या पिढीच फायटर विमान आहे. हे एक स्टेल्थ फायटर जेट आहे. अमेरिकेकडून हे त्यांचं सर्वात Advance फायटर विमान असल्याच सांगण्यात येतं. अमेरिकेच्या या एका विमानाची किंमत 90 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 7 अब्ज रुपये आहे. हे सिंगल सीटर विमान आहे. अचूक लक्ष्यभेद करण्याच्या क्षमतेमुळे या विमानाल पँथर असं नाव देण्यात आलय.

एकाचवेळी 200 फायटर विमानं वापरली

शुक्रवारी इराणवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने एकाचवेळी 200 फायटर जेट्सचा वापर केला. इस्रायलने या मोहिमेला ऑपरेशन रायजिंग लायन नाव दिलं आहे. यात इराणचे अनके बडे लष्करी अधिकारी मारले गेले आहेत. या ऑपरेशनमध्ये इराणचे 6 अणवस्त्र वैज्ञानिक, 4 सैन्य अधिकारी मारले गेले. 60 पेक्षा जास्त इराणी नागरिकांचा मृत्यू झाला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.