अंकारा: तुर्कीत आज जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.8 एवढी होती. स्थानिक वेळेनुसार आज पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्र बिंदू जमिनीच्या आत 17.9 किलोमीटर होता. या धक्क्यामुळे तुर्कीत पत्त्याच्या बंगल्यासारख्या इमारती कोसळल्या. तर वाहनांवर इमारती आणि खांब कोसळल्याने वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या भूकंपात शेकडो लोक दगावल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.