भारताच्या शेजारी बनणार नवा देश ?, या देशात मोठी बंडाळी, राजधानीला घेरले…
रखाईनमध्ये अराकान आर्मीच्या बंडखोर गटांनी आधीच १४ विभागांवर ताबा मिळवण्यात यश मिळवले आहे. आता बंडखोरांनी राजधानी सिटवेला घेरले आहे. येथील धुमश्चक्रीत अलिकडेच ४० सैनिकांचे प्राण गेले आहेत.

भारताचा शेजारील देश म्यानमारमध्ये मोठ्या धुमश्चक्री सुरु आहे. पूर्वीचा ब्रह्मदेश आणि आताचा म्यानमार देशात यादवी सुरु आहे. येथील रखाईन प्रांताला स्वतंत्र करण्याची घोषणा केव्हाही केली जाऊ शकते. अराकान आर्मीने रखाईनला वेगळे राष्ट्र करण्याची लढाई वेगवान केली आहे. राजधानी सिटवेला अराकनच्या यौद्ध्यांनी घेरले आहे आणि या लढाईला शेवटची मोठी लढाई म्हटले आहे. जर राजधानी सिटवेवर अराकन आर्मीने कब्जा केला तर बंडखोर गट रखाईला स्वतंत्र देश बनवण्याची घोषणा करतील.
स्थानिय वृत्तपत्र ‘द इरावाडी’च्या मते अराकन आर्मीने आधीच १७ पैकी १४ विभागांवर कब्जा केला आहे. आता उरलेल्या ३ भागांवर कब्जा करण्याची त्यांची तयारी सुरु आहे. अराकान सैन्याने चीनच्या सिटवेच्या जवळ आपला ताफा सज्ज केला आहे. त्यांचा प्रयत्न सिटवेवर नियंत्रण मिळवण्याचे आहे.
रखाईन स्वतंत्र करण्याची मागणी काय ?
सलल २००९ मध्ये अराकान जात समुहाने ( बौद्ध ) रखाईनला अधिक प्रशासकीय अधिकार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. याच वर्षी अराकान आर्मीची स्थापना करण्यात आली होती. रखाईन बांग्लादेश आणि म्यानमार सीमेच्या जवळील एक प्रांत आहे. येथे साल २०१६ नंतर बंडखोरांनी उठाव केला.
अराकान आर्मीच्या लोकांनी आधी येथील रोहिंग्या समुदायाची कत्तल सुरु केली होती. लोकसंख्येचा दृष्टीने येथे रोहिंग्या अल्पसंख्यांक होते. अराकान आर्मीमुळे येथील रोहिंग्या समुदायाला स्थलांतर करावे लागले. याच दरम्यान म्यानमारचे सरकार कोसळले आणि लष्कराने तेथील सरकार ताब्यात घेतले.
यानंतर अराकान आर्मीने येथील बंडखोरी वेगाने सुरु केली. सुरुवातीला एअरस्ट्राईकमुळे अराकान आर्मी जुंटा सैन्याच्या समोर हरताना दिसत होती, मात्र त्यानंतर या भागात अकारान आर्मीने आपल्या पकड मजबूत केली. आता अराकान आर्मीने रखाईनला स्वंतत्र देश करण्याची मागणी केली आहे.
साल २०२७ पर्यंत स्वतंत्र देश बनवण्याचे लक्ष्य
अराकानने सैन्याचे कमांडर इन चीफ टुन म्यात नाईंग यांनी साल २०२७ पर्यंत संपूर्णपणे मुक्त अराकानचे ध्येय ठेवले आहे. नाईंग यांनी म्हटले आहे की त्यांच्या सैन्य इतके ताकदवान होईल की म्यानमारच्या सैन्याला हा भाग सोडून पळून जावे लागेल. स्थानिय वृत्तपत्र इरावाडीच्या बातमीनुसार सिटवेच्या आसपास अराकान आर्मीने सैन्य टँक, आणि रसद पुरवठा रोखण्यासाठी भूसुरंग पेरले आहेत.
म्यानमारच्या जुंटा सैन्याची अडचण
२९ मे ते १ जून च्या दरम्यान सिटवेच्या नजीक जुंटा सैन्य आणि अराकान आर्मी यांच्या मोठी भीषण चकमक उडाली असून त्यात जुंटाचे ४० सैनिक ठार झाले आहेत. आतापर्यंत अराकान आर्मी म्यानमार सैन्याच्या एअर स्ट्राईकच्या समोर अपक्षेपेक्षा कमजोर पडताना दिसत होती. परंतू अराकान बंडखोरांकडे अलिकडच्या महिन्यातच ड्रोन आणि खांद्यावरुन डागता येणाऱ्या मिसाईल मिळवल्या आहेत. यामुळे आता म्यानमारच्या जुंटा सैन्याला हवाई हल्ले करताना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत.