
नेपाळमधील जनता वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे रस्त्यावर उतरली आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. काही आंदोलकांनी संसद भवन पेटवले आहे. तसेच अनेक मंत्र्यांची घरे जाळली आहेत. जनतेच्या रागामुळे केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर नेपाळमधील जनता वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे रस्त्यावर उतरली आहेपंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक तातडीची बैठकही बोलावली होती. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
देशात आज दिवसभर जाळपोळ सुरु आहे. अशाचत आज नेपाळचे लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी जनतेशी संवाद साधला. सिग्देल म्हणाले की, ‘कठीण परिस्थितीत नेपाळचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता, स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकता आणि नेपाळी लोकांच्या सुरक्षेसाठी लष्कर वचनबद्ध आहे. नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो.’ पुढे बोलताना त्यांनी रात्री 10 वाजल्यापासून देशात लष्करी राजवट लागू करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता नेपाळची सत्ता लष्कराच्या हातात गेली आहे.
नेपाळमधील परिस्थितीवर भारताचीही बारीक नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत लिहिले की, ‘आज, हिमाचल प्रदेश आणि पंजाब दौऱ्यावरून परतल्यानंतर, मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत नेपाळमधील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. नेपाळमधील हिंसाचार हृदयद्रावक आहे. अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, यामुळे खूप वेदना होत आहेत. नेपाळची स्थिरता, शांतता आणि समृद्धी आमच्या खूप महत्त्वाची आहे. मी नेपाळमधील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना शांतता राखण्याचे नम्र आवाहन करतो.’
आज हिमाचल प्रदेश और पंजाब के दौरे से लौटने के बाद Cabinet Committee on Security की बैठक में नेपाल के घटनाक्रम को लेकर विस्तार से चर्चा हुई। नेपाल में हुई हिंसा हृदयविदारक है। यह जानकर बहुत पीड़ा हुई कि इसमें अनेक युवाओं की जान गई है। नेपाल की स्थिरता, शांति और समृद्धि हमारे लिए…
— Narendra Modi (@narendramodi) September 9, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाची बैठक बोलवत नेपाळमधील शांततेवर भाष्य केलं आहे. त्यामुळे भारत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता येत्या काही दिवसांमध्ये नेपाळमध्ये शांतता परतेल अशी आशा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली आहे.