Moscow Attack : जमिनीवर झोपून मरण्याच नाटक….मॉस्को हल्ल्यातून बचावलेल्यांचे भयानक अनुभव

रशियाची राजधानी मॉस्को येथे शुक्रवारी एका कॉन्सर्ट हॉलवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर लोकांचे काळजाचा थरकाप उडवणारे अनुभव समोर आले आहेत. ज्यावेळी दहशतवाद्यांना अंदाधुंद गोळीबार सुरु केला, तेव्हा हॉल लोकांनी खच्चून भरलेला होता. जवळपास 6,200 लोक हॉलमध्ये उपस्थित होते.

Moscow Attack : जमिनीवर झोपून मरण्याच नाटक....मॉस्को हल्ल्यातून बचावलेल्यांचे भयानक अनुभव
Moscow AttackImage Credit source: AP/PTI
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 10:15 AM

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये शुक्रवारी एका कॉन्सर्ट हॉलवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांनी, काळजाचा थरकाप उडवणारे त्यांचे भयानक अनुभव सांगितले आहेत. दहशतवाद्यांनी गोळीबार केला, तेव्हा हॉल लोकांनी खचाखच भरलेला होता. जवळपास 6,200 लोक या हॉलमध्ये उपस्थित होते. रिपोर्टनुसार 133 नागरिकांचा मृत्यू झाला. 140 लोक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी आधी गोळीबार केला. मग कॉन्सर्ट हॉलला आतमधून आग लावली. त्यामुळे उपस्थित लोकांची एकच पळापळ सुरु झाली. लोक इथे-तिथे पळू लागले.

दहशतवाद्यांनी पळणाऱ्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. अनेक पीडितांनी सांगितलं की, आम्हाला हे समजत नव्हतं, नेमक काय होतय. एका महिलने सांगितलं की, तिला असं वाटलं की हा गोळ्यांचा आवाज म्हणजे फटाके फुटतायत. पण जेव्हा तिने लोकांचा आरडाओरडा ऐकला, तेव्हा तिच्या लक्षात आलं की काहीतरी भयानक घडतय.

म्हणून लोक हॉलच्या बाहेर निघू शकले

कॉन्सर्टला गेलेल्या 61 वर्षांच्या ऐलेनाने सांगितलं की, “एक असाही शूरवीर होता, जो त्या परिस्थितीत दुसऱ्याचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत होता. लोक स्टेजच्या पाठिमागच्या बाजूस पळत होते, त्यावेळी एका दहशतवाद्याने त्यांचा रस्ता अडवला” “लोकांमध्ये असलेल्या एका व्यक्तीने हल्लेखोराच्या अंगावर उडी मारली व त्याच्याकडून असॉल्ट रायफल हिसकावून घेतली. त्यामुळे अनेक लोक हॉलच्या बाहेर जाऊ शकले” असं ऐलेनाने सांगितलं.

आगीच्या ज्वाळा वाढल्यानंतर हळूहळू….

आणखी एक पीडित व्यक्ती रुग्णालयात आहे. तिने सांगितलं की, “मी माझ्या मरणाच नाटक केलं म्हणून वाचली. लोकांनी जस जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरु केली, तस दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. मी जमिनीवर पडलेली. त्यामुळे मी माझ्या मरणाच नाटक केलं” महिलेने सांगितलं की, “इमारतीला आग लागल्यानंतर श्वास घेण्यासाठी ती दरवाजाजवळ झोपली. आगीच्या ज्वाळा वाढल्यानंतर हळूहळू रांगत तिथून बाहेर पडली”

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.