AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला मोठा दणका! थेट गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला, इंधन रूमलाच..

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा पेटले आहे. अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केला. तणाव अधिक वाढला आहे. त्यामध्येच आता थेट एका भारतीय जहाजावर होर्मुज खाडीत मोठा हल्ला करण्यात आला. ज्याने मोठी खळबळ उडाली.

भारताला मोठा दणका! थेट गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला, इंधन रूमलाच..
Attack Strait of Hormuz
| Updated on: Jul 08, 2026 | 9:06 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली होर्मुज खाडी पुन्हा पेटली. इराणने केलेल्या जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला चढवला. इराण आणि अमेरिका यांच्या वादात भारताला मोठा दणका बसला आहे. होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने येणाऱ्या जहाजावर हल्ला करण्यात आला. जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्या जहाजावर हल्ला झाला, त्यात एलपीजी गॅस होता. एएनआयच्या रिपोर्टनुसार, एलएनजीसी अल रेकंय्यात नावाचे मोठे जहाज कतारच्या लफ्फान बंदराहून गुजरातच्या दिशेने निघाले होते. यादरम्यानच त्याच्यावर हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर जहाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मिसाईल हल्ल्यानंतर लगेचच जहाजाच्या इंधन रूमला आग लागली. ज्यानंतर त्याच्यातून धूर निघत होता.

ज्यावेळी या जहाजावर हल्ला करण्यात आला, त्यावेळी या जहाजात तब्बल 29 लोक होते. त्यापैकी 4 जण भारतीय नागरिक आहेत. या मिसाईल हल्ल्यानंतरही जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती मिळतंय. भारतासोबतच असूनही एका देशाच्या जहाजावर हल्ला झाल्याची माहिती मिळतंय. ब्रिटिश सुरक्षा एजन्सीच्या म्हणण्यांनुसार, हा हल्ला ओमानच्या समुद्रकिनाऱ्याचा जवळ झाला.

होर्मुज खाडी सोडून जहाज ओमानच्या खाडीत प्रवेश करत होते, त्यावेळीच हा हल्ला झाला. ज्यामुळे आता भारतासोबतच जगाची चिंता वाढली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध शांत झाल्यानंतर जगाने सुटकेचा निश्वास घेतला. मात्र, आता पुन्हा एकदा स्थिती गंभीर होत आहे. भारताकडे येणाऱ्या जहाजवर हल्ला झाल्यानंतर भारत अलर्ट मोडवर आहे. या हल्ल्याबद्दल केंद्र सरकार नक्की काय भूमिका घेते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.

इराणच्या लष्करी तळावरही अमेरिकेने हल्ला केला. आता कुठे हे युद्ध शांत झाले होते, त्यानंतर आता पुन्हा पेटताना दिसत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी व्हावा, ही जगाची मागणी आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढताच पुन्हा एकदा जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होताना दिसली.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु