ऑस्ट्रेलियात 11 दिवसांनी पुन्हा एकदा ज्यूंवर हल्ला, ख्रिसमस आधी कारवर फायर बॉम्बिंग
ज्यूंप्रती घृणा, पूर्वग्रह दूषिक मानसिकता, भेदभाव आणि शत्रुत्व. ही वर्णद्वेषी विचारधारा ज्यूंना टार्गेट करते. त्यांना दोषी मानते. त्यांच्याविरुद्ध हिंसाचार, बहिष्कार आणि कारस्थान करते.

ऑस्ट्रेलियात ख्रिसमसची सकाळ होण्याआधी पुन्हा एकदा ज्यूंवर हल्ला करण्यात आला. असामाजिक तत्वांनी मेलबॉर्न येथे एक रब्बी कार जाळण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियन सरकारने या घटनेला कारची फायर बॉम्बिंग असं नाव दिलं आहे. पंतप्रधान एंथनी अल्बनीज यांनी या घटनेला संशयित अँटी सेमिटिज्म म्हटलं आहे. एंटी-सेमिटिज्मका या शब्दाचा अर्थ होतो की, ज्यूंप्रती घृणा, पूर्वग्रह दूषिक मानसिकता, भेदभाव आणि शत्रुत्व. ही वर्णद्वेषी विचारधारा ज्यूंना टार्गेट करते. त्यांना दोषी मानते. त्यांच्याविरुद्ध हिंसाचार, बहिष्कार आणि कारस्थान करते. ख्रिसमसची सकाळ होण्याआधी रब्बी यांच्या कारवर आग लागेल असा बॉम्ब फेकण्यात आला अशी माहिती ऑस्ट्रेलियन पोलिसांनी दिली. घटनेत कारचा दरवाजा जळाला.पोलिसांनी या रब्बी कुटुंबाची सुटका केली.
पोलीस सेंट किल्डा ईस्टमध्ये झालेल्या या ज्यू विरोधी हल्ल्याची चौकशी करत आहेत. गुरुवारी मध्यरात्री 2.50 च्या सुमारास बालाक्लावा रोडवर रब्बी यांच्या घरातील ड्राइव वे मध्ये उभ्या असलेल्या सेडान कारमध्ये आग लावली. या कारच्या वर ‘हॅप्पी हनुक्का’ हा एक छोटासा बोर्ड लावलेला. या घटनेत कोणी जखमी झालेलं नाही असं पोलिसांनी सांगितलं. खबरदारी म्हणून रब्बी कुटुंबाला तिथून बाहेर काढण्यात आलं.
Australia’s Jewish community is in mourning after the Bondi terrorist attack.
The firebombing of a car in Melbourne is another terrible act of suspected antisemitism. Federal authorities stand ready to assist.
There is no place in Australia for this kind of hatred and it has to…
— Anthony Albanese (@AlboMP) December 25, 2025
आगीची चौकशी
मूरैबिन क्राइम इन्वेस्टिगेशन यूनिटचे हेर 25 डिसेंबरला सेंट किल्डा ईस्टमध्ये लागलेल्या या संशयित आगीची चौकशी करत आहेत. हेराने एका व्यक्तीची ओळख पटवली असून तो चौकशीत मदत करु शकतो. जळालेली कार गुरुवारी सकाळी ड्राइव वे मधून हटवण्यात आला. खिडकीच्या तुटलेल्या काचा यहूदी समुदायाच्या घराच्या ड्राइव वे मध्ये पडलेल्या आहेत. हे घर एक यहूदी शाळेसमोर आहे. समोरच्या दरवाजाजवळ लहान मुलाची एक सायकल आणि बूट ठेवण्यात आलेले.
