AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

41 वर्षानंतर अमेरिका असे शस्त्र पाजळणार की… बाबा वेंगाची ती काळजाचा थरकाप उडवणारी भविष्यवाणी

Baba Vanga Big Prediction : बल्गेरियातील भविष्यवेत्ती बाबा वेंगाने मोठा दावा केला आहे. सध्या अमेरिका जगाला वेठीस धरू पाहत आहे. या व्यापार युद्धाचे पडसाद जगभरात उमटत असतानाच, अमेरिकेविषयी मोठे भाकीत समोर येत आहे.

41 वर्षानंतर अमेरिका असे शस्त्र पाजळणार की... बाबा वेंगाची ती काळजाचा थरकाप उडवणारी भविष्यवाणी
बाबा वेंगाची खतरनाक भविष्यवाणीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 20, 2025 | 3:43 PM
Share

जगभरात अनेक असे लोक आहेत की, त्यांना भविष्यात डोकावण्याची आणि घटना समजून घेण्याची अलौकिक शक्ती मिळाली आहे. त्यात नास्त्रेदमस, बाबा वेंगा यांची नावे आघाडीवर आहेत. बाबा वेंगाच्या तर अनेक भविष्यवाण्या अचूक ठरल्याचा दावा करण्यात येतो. त्यांनी अमेरिकेवरील हल्ला, इसीसविषयी केलेली भाकीतं खरी ठरली आहेत. आता बाबा वेंगा हिने अमेरिकेविषयी मोठं भाकीत केलं आहे. बाबा वेंगाच्या दाव्यानुसार, अमेरिका वर्ष 2066 मध्ये एक असे शस्त्र, अस्त्र तयार करेल की जे निर्सगासाठी आणि पर्यावरणासाठी अत्यंत घातक असेल. आजपासून 41 वर्षांनी ही गोष्ट घडण्याची नोंद तिच्या गूढ काव्यात आढळली आहे.

अनेक घटना ठरल्या खऱ्या

बाबा वेंगा हिचे निधन 1996 साली झाले होते. तिने आतापर्यंत 5079 पर्यंतचे भविष्य वर्तवले आहे. असे मानण्यात येते की हे ते वर्ष आहे, जेव्हा ब्रह्मांडातून पृथ्वीचे अस्तित्व संपेल. त्यांनी अमेरिकेत कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होईल. दुसरे जागतिक युद्ध भडकेल, 9/11 अमेरिकन हल्ला, 2004 मधील त्सुनामी येण्याचा दावा अगोदरच केला होता. त्यांनी अशी भविष्यवाणी केलेली आहे की येत्या 2043 पर्यंत युरोपातील 44 देशांमध्ये मुस्लिम शासन येईल.

वर्ष 2033 मध्ये वातावरणातील बदलामुले समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची भीती तिने व्यक्त केली आहे. याशिवाय 20246 मध्ये मानवासाठी कृत्रिम अवयव मोठ्या प्रमाणात तयार होतील असे भाकीत केले आहे. 2076 मध्ये जगात जाती व्यवस्थेचे पतन होण्याची भविष्यवाणी तिने केली होती.

बाबा वेंगा हिने अनेक गूढ भाकीतं केली आहेत. हवामानातील बदल आणि नैसर्गिक संसाधनांवर येणार ताण यावर अनेक वैज्ञानिकांनी जगाला इशारा दिला आहे. Intergovernmental Panel on Climate Change (IPCC ) च्या एका अहवालानुसार, जागतिक तापमान वाढीचा वेग जर आवरला नाही तर 2100 पर्यंत 40 टक्के लोकसंख्येला जल संकटाला सामोरे जावे लागेल. संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, 2050 पर्यंत 1.8 अब्ज लोकांना गंभीर पाणी संकटाला तोंड द्यावे लागेल. या दरम्यान योग्य उपाय योजना केल्या नाही तर जागतिक तापमानात 2°C ची वाढ दिसेल.

डिस्क्लेमर : बाबा वांगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.