IPL 2025 : शुभमन गिलला ही चूक चांगलीच महागात; आता मोठा दंड भरावा लागणार, BCCI का झाली नाराज?
Shubman Gill Pay fine : गुजरात टाईटन्सचा कर्णधार शुभमन गिल याला भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने (BCCI) जोरदार दणका दिला. गिल याला त्याची ही चूक महागात पडली. आता त्याला दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

सध्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) 2025 चा हंगाम सुरू आहे. त्यातील सामना क्रमांक 35 मध्ये गुजरात टाईटन्सन (LSG) दिल्ली कॅपिटल्सला (DC) 7 गडी बाद करून हरवलं. गुजरात टाईटन्सकडून जोस बटलर याने जोरदार खेळी खेळली. त्याने नाबाद 97 धावा चोपल्या. बटलरचा दमदार खेळीमुळे गुजरातने 2024 धावांचे मोठे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्ससमोर ठेवले. चार चेंडू शिल्लक असताना गुजरात टाईटन्सने हा सामना खिशात घातला. या विजयामुळे गुजरात टाईटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे. हा सामना 19 एप्रिल रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
शुभमनला BCCI चा 12 लाखांचा दंड
या सामन्या नंतर गुजरात टाईटन्सच्या शुभमन गिलवर भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने जोरदार ॲक्शन घेतली. शुभमन गिल याच्यावर हळू गोलंदाजी केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या सामन्यात शुभमन गिल 7 धावा काढून बाद झाला. आता या दंडामुळे तो त्या कर्णधारांच्या पंक्तीत जाऊन बसला ज्यांना बीसीसीआयने दंड ठोठावला आहे. या यादीत हार्दिक पांड्या, रियान पराग, अक्षर पटेल, संजू सॅमसन, रजत पाटीदार हे अगोदरच आहेत.




BCCI ने याविषयी एक प्रेस नोट पण दिली आहे. त्यानुसार, गुजरात टाईटन्सचा कर्णधार शुभमन गिल याच्यावर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरोधात खेळताना हळू गोलंदाजी केल्याने दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या नियमानुसार, कमी गतीने गोलंदाजी करण्याबाबत उल्लेख असलेल्या नियम क्रमांक 2.22 नुसार, त्यांच्या संघाची या हंगामातील ही पहिली चूक आहे. त्यामुळे शुभमन गिल याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
एकीकडे सामना जिंकल्याचा आनंद असताना आता दंडाची वार्ता येऊन ठेपल्याने या संघाचा विजयाच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता पुढील सामन्यात अशी चूक करणे संघाला फायदेशीर ठरणार नाही. या कारवाईमुळे दंड ठोठावलेल्या संघाच्या कर्णधारांच्या यादीत शुभमन गिल दाखल झाला आहे.