Balochistan : BLA चा पाकिस्तानी सैन्याला मोठा दणका, बलूचिस्तान पाकिस्तानच्या हातातून निसटतोय
Balochistan : बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा बलूचिस्तान लिबरेशन फ्रंटने भारताकडे मदत मागितली होती.

बलूचिस्तान पाकिस्तानच्या हातातून निसटत चाललाय. BLA च्या फायटर्सनी पाकिस्तानी सैन्याला गुडघ्यावर आणलय. बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट सतत पाकिस्तानी सैन्यावर हल्ल्याचे व्हिडिओ रिलीज करतोय. गुरुवारी BLA ने एका हल्ल्यात 5 पाकिस्तानी सैनिक मारल्याची माहिती दिली. पाकिस्तानसाठी आता बलूचिस्तानवर नियंत्रण ठेवणं दिवसेंदिवस कठीण बनत चाललय. अलीकडे त्यांना सतत मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतय. बलूच लिबरेशन आर्मीच्या फायटर्सनी जमुरान आणि क्वेटा या दोन ठिकाणी वेगवेगळ्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला टार्गेट केलं. त्यामध्ये पाच सैनिकांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्यासह अनेक जण जखमी झाले.
बलूच फायटर्सनी केचच्या जमुरान भागात कुंड कापरान येथे पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर घात लावून हल्ला केला. हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याची दोन वाहनं नष्ट झाली. या हल्ल्यात पाच सैनिकांचा जागीच मृत्यू झाला. अनेक जखमी झाले. अशाच प्रकारचा हल्ला सोमवारी BLA ने क्वेटाच्या पूर्व बायपास बकरा मंडीजवळ केला होता. यात एका पोलीस वाहनाला टार्गेट करुन ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात SHO नूरुल्लाह आणि अन्य स्टाफ जखमी झाला.
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा मागितलेली मदत
“बूलच लिबरेशन आर्मी दोन्ही ऑपरेशन्सची जबाबदारी घेते. आमचा सशस्त्र संघर्ष तो पर्यंत सुरु राहिल, जो पर्यंत राष्ट्रीय मुक्ती लढा यशस्वी होत नाही” असं बलूच लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जीयंद बलूच यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी सुद्धा बलूचिस्तान लिबरेशन फ्रंटने भारताकडे मदत मागितली होती. भारताने सहकार्य केलं, तर बलूचिस्तानला पाकिस्तानपासून लवकर स्वतंत्र करु असं फ्रंटच म्हणणं होतं.
🚨 5 Occupying Pakistani Army Personnel Eliminated
Baloch Liberation Army (BLA) freedom fighters struck in Zamuran & Quetta, targeting Pakistan Army & sub-forces.
🎯 5 Eliminated ⚠️ Several Injured, incl. an officer
BLA’s resistance for Baloch freedom continues.#Balochistan pic.twitter.com/8cMh1MGkKJ
— Baloch Bhaijaan (@Baloch_BhaiJaan) June 4, 2025
बलूच जनतेचा पाकिस्तावर इतका राग का?
पाकिस्तानच्या स्थापनेपासून बलूचिस्तानचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरु आहे. बलूच नागरिकांना पाकिस्तानसोबत रहायच नाहीय. त्यांची स्वत:ची वेगळी संस्कृती आहे. बलूचिस्तानात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पाकिस्तानने नेहमीच या भागातील साधन संपत्तीची लूट केली. बलूचिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या हक्काच काही दिलं नाही. त्यांच्या अधिकारांवर दडपशाही केली. बलूचिस्तानच लुटून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये नेल. आता या सगळ्याची परिणीत बलूचिस्तानच्या सशस्त्र लढ्यात झाली आहे.
