Bangladesh Mohammad Yunus : जाता-जाता सुद्धा बांग्लादेशच्या मोहम्मद युनूस यांनी भारताला दुखावलं, शेवटच्या भाषणातही घृणा, द्वेष

Bangladesh Mohammad Yunus : भारताबद्दलची त्यांची घृणा, द्वेष जाहीरपणे समोर आला होता. त्यानंतर शेख हसीना यांच्यावरुन मोहम्मद युनूस यांनी अनेकदा भारतविरोधी भूमिका मांडली. बीएनपी नेता तारिक रहमान बांग्लादेशात आल्यानंतर परिस्थिती थोडी बदलली आहे.

Bangladesh Mohammad Yunus : जाता-जाता सुद्धा बांग्लादेशच्या मोहम्मद युनूस यांनी भारताला दुखावलं, शेवटच्या भाषणातही घृणा, द्वेष
mohammad yunus
| Updated on: Feb 17, 2026 | 12:54 PM

बांग्लादेशात आज बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्याआधी बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद यूनुस यांनी राजीनामा दिला. निरोपाचं भाषण करताना त्यांनी भारताविरोधात गरळ ओकली. भारताचं नाव न घेता आपला जुना राग आळवला. युनूस यांनी ईशान्य भारतातील सात राज्यांचा सेव्हन सिस्टर्स असा उल्लेख केला. युनूस यांच्या बोलण्यातून त्यांचं चीन प्रेमही दिसून आलं. एप्रिल 2025 मध्ये मोहम्मद युनूस चीन दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी सुद्धा त्यांनी बीजिंगमध्ये सेव्हन सिस्टर्सचा उल्लेख केला होता. त्यावेळी त्यांनी सेव्हन सिस्टर्स लँड लॉक्ड (जमिनीने घेरलेलं क्षेत्र) असल्याचं म्हटलं. बांग्लादेशच या भागासाठी मुख्य संरक्षक असल्याचा त्यांनी जाहीर केलेलं. भारताच्या विरोधानंतर युनूस यांनी मौन धारण केलं.

भारताबद्दलची त्यांची घृणा, द्वेष जाहीरपणे समोर आला होता. त्यानंतर शेख हसीना यांच्यावरुन मोहम्मद युनूस यांनी अनेकदा भारतविरोधी भूमिका मांडली. बीएनपी नेता तारिक रहमान बांग्लादेशात आल्यानंतर परिस्थिती थोडी बदलली आहे. निरोपाच्या भाषणात मोहम्मद युनूस यांनी थेट भारताचं नाव घेतलं नाही. पण त्यांचा इशारा बऱ्याच प्रमाणात भारताकडे होता. युनूस यांनी या दरम्यान नेपाळ आणि भूतान यांचा सुद्धा उल्लेख केला. पण त्यांच्याबद्दल बोलताना मैत्रीचा भाव त्यांच्या बोलण्यात जाणवला. बांग्लादेशला त्यांनी कनेक्टिविटी हब म्हटलं.

युनूस यांनी टोमणे मारले

माझ्या कार्यकाळात बांग्लादेश आधीपेक्षा जास्त मजबूत झालाय असा दावा त्यांनी केला. “बांग्लादेश आता कोणाच्या अधीन राहून परराष्ट्र धोरण राबवणारा किंवा दुसऱ्या देशांचे निर्देश, सल्ले मानणारा देश नाहीय. देश आता आपले निर्णय स्वत: घेऊ शकतो” असं युनूस म्हणाले. बांग्लादेश आता स्वत:चा सन्मान आणि हितांच्या आधारावर जगातील सर्व देशांसोबत संबंध बनवण्यासाठी तयार आहे असं ते म्हणाले. भारताचं नाव टाळून अनेकदा आपल्या भाषणातून युनूस यांनी टोमणे मारले.

ईशान्य भारतातली सात राज्यं कुठली?

पूर्वोत्तर भारत म्हणजे ईशान्य भारतातली सात राज्यं. यात अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर, मिजोरम, नागालँड आणि त्रिपुरा यांचा समावेश होतो. यात सेव्हन सिस्टर्स म्हटलं जातं. ही राज्यं आपली भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक समानतेसह आर्थिक दृष्टया परस्परांवर अवलंबून आहेत. 1972 साली ज्योती प्रसाद सैकिया यांनी या नावाचा वापर केला होता. सिक्किमला या राज्यांचं भाऊ म्हटलं जातं. सिक्किमची सीमा या सात राज्यांना लागून नाहीय.