Barak And Michelle Obama | ‘बराक आणि मिशेल ओबामा’ यांच्या ‘या’ फोटोची सोशल मीडियावर धूम

सोशल मीडियावर हे फोटो पाहिल्यानंतर युझर्स देखील हैराण झाले. या मुलांचे निरागस फोटो पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत.

Barak And Michelle Obama | ‘बराक आणि मिशेल ओबामा’ यांच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर धूम
मुलांचे फोटो पाहून नेटकरी मंत्रमुग्ध

वॉशिंग्टन : सोशल मीडियावर नेहमी कुठली ना कुठली चर्चा सुरुच असते (Barak And Michelle Obama Photo). या यादीत आता सामान्य व्यक्तीपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वच सहभागी होतात. यामध्ये आता अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबाम आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे देखील चर्चेत आहेत. हे चर्चेत राहण्याचं कारण नाही कुठला राजकीय अजेंडा आणि नाही कुठली इतर अॅक्टिव्हीटी. तर, एक असा फोटो समोर आला आहे ज्यामध्ये दोन क्युट मुलं बराक आणि मिशेल ओबामासारखे दिसत आहेत. चला जाणून घेऊ या फोटोबाबत… (Barak And Michelle Obama Photo)

सोशल मीडियावर हे फोटो पाहिल्यानंतर युझर्स देखील हैराण झाले. या मुलांचे निरागस फोटो पाहून नेटकरी मंत्रमुग्ध झाले आहेत. इन्स्टाग्रामवर या फोटोला स्वत: मिशेल ओबामाने शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Michelle Obama (@michelleobama)

या फोटोमध्ये दोन मुलं दिसत आहेत, ज्यांचं नाव Ryleigh आणि Zayden असं आहे. यापैकी एक जण बराम ओबामा यांच्या गेटअपमध्ये आहेत, तर एक मिशेल ओबामाच्या गेटअपमध्ये आहेत. मिशेल ओबामाने या दोन्ही मुलांचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. त्यांनी हे फोटो त्यांच्या मित्रांसोबत शेअर केली. या दोन्ही मुलांनी पाहून त्या दिवसाचं स्मरण झालं, जेव्हा 2021 च्या उद्घाटन दिवसाच्या प्रसंगी बराक ओबामा आणि मिशेल ओबामा एकत्र दिसले होते.

सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या फोटोला 42 लाखांच्या वर लाईक्स मिळाले आहेत. तसेच, या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा पाऊसही पडतो आहे. काही लोकांनी या मुलांचं खूप कौतुक केलं आहे. काहींनी या फोटोला अद्भुत असल्याचं सांगितलं आहे.

Barak And Michelle Obama Photo

संबंधित बातम्या :

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची जागा घेणार, कोण आहेत अ‍ॅमेझॉनचे नवे सीईओ अँडी जेसी?

जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती राजीनामा देणार, पण नंतर काय करणार?

VIDEO : ‘ती’ व्यायाम करता करता व्हिडीओ बनवत होती, कैद झाली म्यानमार तख्तापलटची संपूर्ण घटना

एक हिरोईन, एका राष्ट्राध्यक्षाची गर्लफ्रेंड, दुसऱ्या सत्ताधीशाची बायको, अफेअर्सची चर्चा जगभर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI