मोठी बातमी! पाकिस्तानातून भारताला खुले पत्र, थेट मोठा इशारा, नवीन वर्षाच्या..

भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायमच तणावात राहिले. दहशतवाद्यांचा देश म्हणून जगभरात पाकिस्तानची ओळख झाली असून भारतावर मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कायमच पाकिस्तानकडून प्रयत्न केला जातो. त्यामध्येच पाकिस्तानमधून एक पत्र भारताला पाठवण्यात आले.

मोठी बातमी! पाकिस्तानातून भारताला खुले पत्र, थेट मोठा इशारा, नवीन वर्षाच्या..
Mir Yar Baloch
| Updated on: Jan 02, 2026 | 8:53 AM

गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावात बघायला मिळाले. पाकिस्तानकडून सतत भारताविरोधात काड्या केल्या जात आहेत. भारतात दहशतवादी कारवाया पाकिस्तानकडून घडवून आणल्या जात आहेत. त्याचे बरेच पुरावेही भारताने वेळोवेळी दिली आहेत. बलुच नेते मीर यार बलोच यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भारतासोबतचे ऐतिहासिक संबंध, दहशतवादाविरोधातील कारवाई आणि पाकिस्तानमधील बलुचिस्तान संघर्ष आणि चीन पाकिस्तान युती यासारख्या अनेक मुद्द्यांवर मोठा इशारा दिला आहे. मीर यार बलोच यांनी पत्रात म्हटले की, बलुचिस्तान प्रजासत्ताकाच्या 6 कोटी देशभक्त नागरिकांच्या वतीने भारताच्या 1.4 अब्ज जनतेला, संसदेच्या दोन्ही सभागृहांना, सर्व आदरणीय नागरिकांना, प्रसारमाध्यमांना 2026 या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे.

व्यापार, सांस्कृतिक, राजनैतिक यासोबतच संरक्षण संबंधांवर चर्चाही केली. मीर यार बलोच यांनी हिंगलाज माता मंदिराला दोन्ही देशांच्या सामायिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हटले. यावेळी त्यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे देखील काैतुक केले. भारताने दहशतवादाविरोधात मोठे पाऊल उचलत थेट ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ववस्थ केली.

पत्रात पाकिस्तान आणि चीन यांच्यातील वाढती भागीदारी अत्यंत धोकादायक असल्याचे वर्णन केले. मीर यार बलोच यांनी इशारा दिला की, चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे, ज्यामुळे संतुलन बिघडू शकते. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानने फक्त चीनसोबतच नाही तर अमेरिकेसोबतही जवळीकता वाढवली. यामुळे भारताची डोकेदुखी वाढली.

मीर यार बलोच यांनी पुढे पत्रात म्हटले की, सध्याच्या परिस्थितीला फक्त आश्वासनांची नव्हे, तर ठोस आणि परस्पर सहकार्याची गरज आहे. भारत आणि बलोचिस्तान या दोघांसमोरील मोठी संकटे आहेत. शेवटी पत्राचा शेवट करत त्यांनी म्हटले की, आम्हाला नक्कीच अपेक्षा आहे की, भारताकडून या पत्रावर विचार केला जाईल आणि दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील. आता हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतंय.