AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bhutan : जवळचा मित्र असूनही पेट्रोलच्या बाबतीत भूतानने भारताला दिला मोठा धक्का, विश्वास ठेवायला तयार नाही

India-Bhutan : भूतान भारताचा जवळचा मित्र आहे. बऱ्याच गोष्टींसाठी भूतान भारतावर अवलंबून आहे. चीन सतत या देशाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असतो. रणनितीक दृष्टया भूतान भारतासाठी महत्वाचा देश आहे.

India-Bhutan : जवळचा मित्र असूनही पेट्रोलच्या बाबतीत भूतानने भारताला दिला मोठा धक्का, विश्वास ठेवायला तयार नाही
E20 Petrol
| Updated on: Jul 04, 2026 | 12:30 PM
Share

भारतात सध्या E20 पेट्रोल वरुन बऱ्याच चर्चा सुरु आहेत. E20 पेट्रोल म्हणजे त्यात 20 टक्के इथेनॉल मिसळलेलं असतं. या E20 पेट्रोलमुळे गाड्यांचं नुकसान होत असल्याचा वाहन चालकांचा दावा आहे. सोशल मीडियावर या संदर्भात बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. E20 पेट्रोलमुळे गाड्यांचे पार्ट्स खराब होतात, मायलेज कमी होतो, पण ग्राहकांकडे काही पर्याय नाही अशा अनेक तक्रारी या पेट्रोल संदर्भात आहेत. इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि Jio-bp सारख्या बड्या कंपन्यांकडून सुद्धा E20 पेट्रोलची विक्री सुरु आहे.

भारताच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने आदेश काढलेत की, काही अपवाद वगळून संपूर्ण देशात स्टँडर्ड पेट्रोल म्हणून E20 पेट्रोलचा पुरवठा करावा. IOCL, BPCL आणि HPCL या भारतीय कंपन्यांकडून भूतानलाही मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होतो. भूतानच्या लोकांनी त्यांच्या व्यापार विभागाला हा प्रश्न विचारला. चुनजोम येथील आपल्या प्रयोगशाळेने या इथेनॉलची चाचणी केलीय का?.

E20 पेट्रोल हाताळणीत आव्हानं काय?

भारतीय ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी भूतानला E20 पेट्रोलच्या पुरवठ्याचा प्रस्ताव दिला आहे. पण भूतानने अजून हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. सामान्य पेट्रोलचा MS ग्रुप असतो, तर इथेनॉल मिश्रित पेट्रोलमध्ये हायड्रॉक्सिल (-OH) ग्रुप असतो. इथेनॉल मिश्रित फ्यूलमध्ये पाणी मिसळल्यास पाणी आणि फ्यूल यांना सहज वेगळं करता येत नाही. त्याने फ्यूलची क्वालिटी आणि गाडीच्या परफॉर्मन्सवर परिणाम होण्याची शक्यता असते. सध्या फ्यूल डीलर्सकडे ज्या अंडरग्राऊंड टाक्या आहेत, त्यांची स्थिती आणि क्वालिटी पाहता इथेनॉल मिश्रित फ्यूलची आयात, हाताळणी, फ्यूलचा दर्जा टिकवून ठेवणं आणि भेसळं रोखणं यात आव्हान येऊ शकतात.

भूतानने काय सांगितलय?

जो पर्यंत भारतीय बाजारपेठेत सामान्य MS पेट्रोल उपलब्ध आहे, तो पर्यंत भूतानला सामान्य MS चा पुरवठा कायम ठेवा. भारताने जर इथेनॉल ब्लेडिंगचा प्रमाण वाढवलं, तर आम्हाला आधी कळवा असं भूतानने सांगितलं आहे. यामुळे फ्यूल डिलर्सना PSU/OMC सोबत मिळून अंडरग्राऊंड स्टोरेज आणि फ्यूल हाताळणीची सिस्टिम अपग्रेड करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ