AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धभूमीत खळबळ! अमेरिकेकडून गुप्तचर प्रमुखाचा खात्मा, इराणला तगडा झटका

Iran vs US : इराणला एक मोठा झटका बसला आहे. इराणच्या IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) च्या गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल मजीद खादमी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

युद्धभूमीत खळबळ! अमेरिकेकडून गुप्तचर प्रमुखाचा खात्मा, इराणला तगडा झटका
Majid KhademiImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 06, 2026 | 3:15 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेत तणावाचे वातावरण आहे. इराणकडून अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र आता इराणला एक मोठा झटका बसला आहे. इराणच्या IRGC (इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) च्या गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल मजीद खादमी यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मृत्यू झाला आहे. इराण सरकारने खादमी यांच्या मृत्यूची पुष्टी केली असून हल्ल्याला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. खादमी हे इराणमधील सर्वात प्रभावशाली गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एक होते, मात्र आता त्यांच्या मृत्यूमुळे इराणच्या सुरक्षा व गुप्तचर व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मेजर जनरल मजीद खादमी कोण होते?

मजीद खादमी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. खादमी यांची 2022 मध्ये इराणच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यापूर्वीचे गुप्तचर प्रमुख मोहम्मद काझमी आणि त्यांचे डेप्युटी हसन मोहाकिक हे दोघेही इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेले होते. तसेच इराणचे आणखी एक वरिष्ठ लष्करी कमांडर मोहसेन बघेरी यांचाही मृत्यू झाला होता. या सर्व घटनांनंतर इराणची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी खादमी यांच्याकडे गुप्तचर विभागाचे नेतृत्व देण्यात आले होते. पदभार स्वीकारल्यानंतर खादमी यांनी गुप्तचर यंत्रणेत अनेक सुधारणा केल्या आणि ते अनेक महत्त्वाच्या गुप्तहेर कारवायांमध्ये सहभागी झाले होते. ते पूर्वी इराणच्या संरक्षण मंत्रालयातील गुप्तचर सुरक्षा संघटनेचे प्रमुख म्हणूनही कार्यरत होते, जिथे त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांचे नियोजन केले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा इराणसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

इराणच्या सत्तेत महत्त्वाचे स्थान

मेजर जनरल मजीद खादमी हे इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे जवळचे आणि विश्वासू अधिकारी होते. खादमी यांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरक्षा आणि गुप्तचर ऑपरेशन्सचा मोठा अनुभव होता, त्यामुळेच त्यांना प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आता खादमी यांचा मृत्यू इराणसाठी मोठे नुकसान मानले जात आहे. कारण मध्यपूर्वेत तणावाचे वातावरण असताना इराणची सुरक्षा व्यवस्था काही प्रमाणात कमकुवत होऊ शकते. यामुळे या युद्धात अमेरिका आणि इस्रायलला आघाडी घेण्याची संधी मिळू शकते.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?