गिफ्टचा झोल महागात पडला; इमरान खान यांचे राजयकीय करियर पूर्णपणे बरबाद
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानंतर (ईसीपी) आता इस्लामाबाद उच्च न्यायालयाने देखील इमरान खान यांना झटका देणारा निर्णय दिला आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान भ्रष्टाचार प्रकरणात चांगलेच अडकले आहेत. त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. गिफ्टचा झोल त्यांच्या चांगलाच अंगाशी आला आहे. या प्रकरणात इमरान खान यांचे राजयकीय करियर पूर्णपणे बरबाद झाले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानंतर (ईसीपी) आता इस्लामाबाद उच्च न्यायालयाने देखील इमरान खान यांना झटका देणारा निर्णय दिला आहे.
तोशाखाना अर्थात तिजोरी प्रकरणी ईसीपीने इम्रान खान भ्रष्ट व्यवहारांसाठी दोषी ठरले आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इमरान खान यांना पाच वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे.
इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे इम्रान खान यांच्या अडचणी वाढणार आहेत.
शुक्रवारी तोशाखाना प्रकरणात निर्णय देताना निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले. इम्रान खान यांनी खोटी विधाने करून आणि खोट्या घोषणा दाखवून भ्रष्टाचार केल्याचा दावा निवडणूक आयोगाने निर्णय देताना केला.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात इमरान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालायाने त्यांची याचिका फेटाळली. इमरान खान यांचे राजकीय भवितव्य संकटात सापडले आहे. निर्णयानुसार आते निवडणूक लढवू शकणार नाहीत.
पंतप्रधान पदावरून पाय उतार झाल्यानंतर इम्रान खान यांची खासदारकीही रद्द झाली आहे. सत्ता गेली, पद गेलं यानंतर आता पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर आता जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे. सत्ता गेली आणि पद गेल्यांनतर इमरान खान यांच्यावर आता जेलमध्ये जाण्याची वेळ येणार आहे.
ईसीपी इम्रान खान यांच्याविरुद्ध भ्रष्ट व्यवहारांसाठी कायदेशीर कारवाई सुरू करणार आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणात लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इम्रान खान यांच्यावर सत्तेत असताना परदेशी नेत्यांकडून भेटवस्तू मिळाल्या होत्या. या मौल्यवान आणि अत्यंत महागड्या भेट वस्तुंबाबत अधिकाऱ्यांची पूर्णपणे दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
या भेट वस्तुंमध्ये रोलेक्सच्या सात घड्याळांसह इतर महागडी घड्याळे, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, महागडे पेन, सोन्याच्या कफ लिंक्स, अंगठ्या, लाखो रुपयांच्या डिनर सेटपासून परफ्यूमसह सोन्याच्या AK-47 या बंदुकीचाही समावेश आहे.
