AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा नको तोच निर्णय, भारतासह चीनवरही टॅरिफचे..

भारताच्या समस्येत मोठी वाढ झाली. भारतावर अमेरिका कोणत्याही क्षणी मोठा टॅरिफ लावू शकते. दोन्ही देशातील संबंध पुन्हा तणावात येतील. भारतासोबत अमेरिका चीनवरही मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत आहे. तसा निर्णय जवळपास झाला.

भारताला ज्याची भीती तेच घडले, अमेरिकेचा नको तोच निर्णय, भारतासह चीनवरही टॅरिफचे..
Donald Trump
| Updated on: Sep 17, 2026 | 8:30 AM
Share

भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावण्यात आला. अमेरिका मागील काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेत आहे. त्याच पुन्हा भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात आला. त्यातच भारतात ब्रिक्स परिषद पार पडली. यादरम्यान भारत आणि चीनची जवळीकता पाहून अमेरिकेचा जळफळाट उठला आहे. भारताला ज्याची भीती आहे, तेच घडताना पुन्हा दिसतंय. भारत आणि चीन यांच्यावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. फक्त हेच नाही तर अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने रशियन अधिकारी आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांना टार्गेट करण्यासाठी कठोर निर्बंधांतचा विधेयक मंजुर केला. ज्यात भारतासह चीनसारख्या देशांवर टॅरिफ लादला जाऊ शकतो.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून रशियाकडून तेल आणि वायूची खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लादला जाणार आहे. 100 टक्के टॅरिफ लादला जाणार आहे. भारतावर टॅरिफचे मोठे संकट आहे. हे विधेयक दिवंगत सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या नावाने ओळखले जाते, ज्यांनी यावर वर्षभरापेक्षा जास्त काळ काम केले होते. युक्रेन रशिया यांच्या युद्धाबाबत हे विधेयक आहे.

हे विधेयक आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प स्वत: या विधेयकासाठी आग्रही होते. ज्यामुळे हे विधेयक आणले जाणार हे स्पष्टच आहे. अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजने रशिया आणि इराणवर नवीन निर्बंध लादणारे एक सर्वसमावेशक विधेयक 262 विरुद्ध 159 अशा मतांनी मंजूर केले आहे. या विधेयकाचे अधिकृत नाव ‘लिंडसे ओ. ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ॲक्ट ऑफ 2026 असे आहे.

यापूर्वी, अमेरिकेच्या सिनेटने ऑगस्ट महिन्यात 86 विरुद्ध 11 अशा मतांनी हे विधेयक मंजूर केले होते. हे विधेयक रशियाविरोधात असले तरीही मोठा फटका भारतालाही बसणार आहे. कारण अमेरिकेकडून मोठा टॅरिफ भारतावर लादला जाईल. भारतावर गेल्या काही दिवसांपासून अमेरिका टॅरिफ लादताना दिसत आहे. चीनवरही हे निर्बंध लादली जाणार आहेत. चीनही अमेरिकेविरोधात अॅक्शन घेऊ शकते.

Follow Us
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती