AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकिस्तानचं लाहोर शहर स्फोटांनी हादरलं, प्रत्यक्षदर्शी म्हणतात मिसाईल हल्ला, VIDEO

Operation Sindoor : पाकिस्तानच्या लाहोर शहरात अनेक स्फोट झाल्याच वृत्त आहे. स्फोटाचे आवाज दूर दूर पर्यंत ऐकू आले. लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानंतर नागरिक घराच्या बाहेर एकत्र जमले आहेत. परिसरात दहशतीच वातावरण आहे.

Operation Sindoor : पाकिस्तानचं लाहोर शहर स्फोटांनी हादरलं, प्रत्यक्षदर्शी म्हणतात मिसाईल हल्ला, VIDEO
Pakistan Lahore
| Updated on: May 08, 2025 | 9:26 AM
Share

पाकिस्तानच्या अडचणी कमी होण्याच नाव घेत नाहीयत. गुरुवारी पाकिस्तानच्या लाहोर शहरात एका पाठोपाठ एक अनेक बॉम्ब स्फोट झाले. लाहोरच्या जुन्या विमानतळाजवळ हे स्फोट झाले. त्यानंतर लाहोर एअरपोर्ट बंद करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे की, हा मिसाइल हल्ला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर हा दुसरा मोठा हल्ला मानला जातोय. किती जिवीतहानी झालीय ते अजून समोर आलेलं नाही. पण इमारतींच मोठ नुकसान झाल्याच फोटोंमधून दिसतय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार दोन ते तीन स्फोट झाले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा हल्ला मिसाईलद्वारे करण्यात आला. या घटनेनंतर लाहोर एअरपोर्ट तात्काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उड्डाण प्रभावित झाली आहेत. प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय.

लाहोरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आल्यानंतर नागरिक घराच्या बाहेर एकत्र जमले आहेत. परिसरात दहशतीच वातावरण आहे. पोलीस सूत्रांनुसार वॉल्टन एअरपोर्टजवळ ड्रोन बलास्ट झालाय. हा स्फोट ड्रोनमुळे झालाय. जॅमिंग सिस्टिममुळे हे ड्रोन पाडण्यात आलं असं तिथल्या पोलिसांच म्हणणं आहे. पाकिस्तानच्या समा टीव्हीच्या रिपोर्टनुसार, गुरुवारी सकाळी लाहोरच्या वॉल्टन रोडवर जोरदार स्फोटाचा आवाज ऐकू आला. वॉल्टर एअरपोर्टजवळ असलेल्या लाहोरच्या गोपाळ नगर आणि नसीराबाद भागात लागोपाठ ब्लास्ट झाले. सायरन वाजल्यानंतर लोक तात्काळ घराच्या बाहेर निघून आले.

पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत. 22 एप्रिलपासून पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. 7 मे ची रात्र ते कधी विसरणार नाहीत. कारण त्यांच्या मनातील ही भिती खरी ठरली. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. पाकिस्तान आणि POK मध्ये 9 ठिकाणी एअर स्ट्राइक केले. भारताच्या या कारवाईत जवळपास 100 दहशतवादी मारले गेले. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा मोहरक्या मसूद अझहरच कुटुंब सुद्धा खलास झालं. भारताने या स्ट्राइकद्वारे पाकिस्तानातील दहशतवादाच कंबरडं मोडलं.

BLA कडून कोंडी

पाकिस्तानी सैन्याला एकाबाजूला भारतीय सैन्याकडून मार पडतोय. दुसऱ्याबाजूला बलोच लिबरेशन आर्मी BLA ने त्यांच्या नाकात दम केला आहे. मंगळवारी BLA ने पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला टार्गेट केलं. यात अनेक सैनिक मारले गेले.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.