AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! पाणबुडीच्या आत कॅप्टनच्या कृत्याने रॉयल नेवीला लाज आणली, महिला नौसैनिकासोबत….

पाणबुडी खोल समुद्रात असताना सर्वकाही कॅप्टनवर असतं. कॅप्टनच त्या पाणबुडीचा सर्वेसर्वा असतो. पाणबुडीच्या रक्षणाची, शिस्त राखण्याची जबाबदारी कॅप्टनची असते. पण खोल समुद्रात कॅप्टनलाच आपल्या जबाबदारीचा विसर पडला तर? अशीच धक्कादायक घटना रॉयल नेवीमध्ये घडली आहे.

धक्कादायक! पाणबुडीच्या आत कॅप्टनच्या कृत्याने रॉयल नेवीला लाज आणली,  महिला नौसैनिकासोबत....
Navy WarshipImage Credit source: (AI Generated)
| Updated on: Aug 12, 2024 | 1:38 PM
Share

कुठल्याही युद्धात पाणबुडीची भूमिका खूप महत्त्वाची असते. कारण पाणबुडीमध्ये पाण्याखालून हल्ला करण्याची क्षमता असते. युद्धाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत पाणबुड्यांनी अनेक महाकाय युद्धनौकांना जलसमाधी दिली आहे. त्यामुळे पाणबुडी कुठल्याही नौदलासाठी महत्त्वाची असते. आज पाणबुडी तंत्रज्ञानात मोठा बदल झाला आहे. अनेक अत्याधुनिक पाणबुड्या अशा आहेत, ज्या समुद्रात काही हजार फूट खोल जाऊ शकतात. ही पाणबुडी हाताळण्याासठी एक पथक असतं. प्रत्येक पाणबुडीचा एक कॅप्टन असतो. पाणबुडीच रक्षण करण्याची, शिस्त राखण्याची जबाबदारी त्या कॅप्टनची असते. पण कॅप्टनलाच त्याच्या जबाबदारीचा विसर पडला तर?. असाच एक धक्कादायक प्रकार ब्रिटनच्या रॉयल नेवीमध्ये घडला आहे.

ब्रिटनच्या नौदलात सगळेच जण यामुळे हैराण झालेत. ब्रिटनमध्ये एका कॅप्टनने पाणबुडीच्या आत महिला नौसैनिकासोबत अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या कॅप्टनवर कारवाई करण्यात आलीय. ब्रिटनच्या रॉयल नेवीने वॅनगार्ड पाणबुडीच्या कॅप्टनला नोकरीवरुन काढून टाकलं आहे. महत्त्वाच म्हणजे अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम असलेली ही पाणबुडी होती. कॅप्टनने फक्त प्रायवेट मोमेंट्चसा व्हिडिओच बनवला नाही, तर आपल्या ज्यूनियर सोबत तो व्हिडिओ शेअर केला. ज्यावेळी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला, त्यावेळी 4 बिलियन पाऊंडची ही पाणबुडी समुद्रात तैनात होती. या व्हिडिओमुळे ब्रिटेन रॉयल नेवीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.

त्या कॅप्टनला पुरस्कार मिळालेला

अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेच तपास सुरु केला. ‘द सन’च्या वृत्तानुसार, पाणबुडीच्या कॅप्टनचे त्याच टीममधील महिलेसोबत अनैतिक संबंध होते. पाणबुडीमध्ये ज्या अधिकाऱ्याने हे कृत्य केलं, त्याला राजकुमारी ऐनीकडून OBE साठी सन्मानित करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ समोर येताच कॅप्टनला तात्काळ नोकरीतून काढून टाकण्यात आलं, असं ‘द सन’ने म्हटलं आहे.

रॉयल नेवीमध्ये असं पहिल्यांदा घडलेलं नाही

“नियमांमध्ये न बसणारं कुठलही वर्तन आम्ही गांभीर्याने घेतो. असे प्रकार रोखण्यासाठी योग्य ती पावलं उचलतो. जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, मग त्याचा रँक काहीही असो” असं रॉयल नेवीने ‘द सन’ बरोबर बोलताना म्हटलं आहे. रॉयल नेवीमध्ये घडलेली ही अशी पहिली घटना नाहीय. 2017 मध्ये व्हाइस कॅप्टन आणि त्याचा डेप्युटी HMS विजिलेंटवर दोन ज्यूनियर महिला अधिकाऱ्यांसोबत संबंध ठेवल्याचा आरोप होता.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.