AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या समस्येत मोठी वाढ, अमेरिकेनंतर ‘या’ देशाने दिला झटका, थेट आता…

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावल्याने भारत चिंतेत असताना आता भारताच्या विरोधात अजून एक देश मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. आता भारत हे प्रकरण कशाप्रकारे हाताळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे जगाच्या नजरा आहेत.

भारताच्या समस्येत मोठी वाढ, अमेरिकेनंतर 'या' देशाने दिला झटका, थेट आता...
Narendra Modi
| Updated on: Aug 12, 2025 | 8:18 AM
Share

भारत आणि अमेरिकेमध्ये टॅरिफवरून संबंध ताणले गेले असतानाच आता अजून एका दुसऱ्या देशाने भारताला मोठा धक्का दिलाय. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ शुल्क आकारले आहे आणि याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. भारत अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चिंतेत असतानाच आता अजून एका दुसऱ्या देशाने धक्का दिल्याचे बघायला मिळतंय. ब्रिटिश सरकारने भारताच समावेश अशा देशांच्या यादीत केलाय, ज्यांचे नागरिक आधी हद्दपार आणि नंतर कोर्टात अपील करण्याचे धोरण आहे.

ब्रिटिश सरकारने त्या 15 देशांच्या यादीमध्ये भारताच्या नावाचाही समावेश केलाय. या धोरणांतर्गत भारतीय नागरिक ब्रिटनमध्ये गुन्ह्यांमध्ये आढळल्यास त्यांना आधी हद्दपार केले जाईल, त्यानंतर त्यांच्या अपिलावर सुनावणी होईल. हा भारताला खरोखरच मोठा धक्का म्हणावा लागेल. ब्रिटिश सरकारने हे स्पष्ट केले की, त्यांचा यामध्ये उद्देश फक्त इतकाच आहे की, जेलमधील गर्दी ही कमी व्हावी. मागील काही वर्षांपासून ब्रिटनमधील गुन्हेगारी वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

लोकांनी गुन्हे करताना चार वेळा विचार करावा. आता या नियमानुसार एखादा व्यक्ती दोषी आढळला की, त्याला लगेचच ब्रिटिनमध्ये हद्दपार केले जाईल. गुन्हात दोषी आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीला हद्दपार सर्वात अगोदर केले जाईल आणि सुनावणीदरम्यान भारतातून व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून त्याला उपस्थित राहवे लागेल. मागील काही दिवसांपासून अवैध ब्रिटनमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर कारवाई केली जात आहे.

ब्रिटन देशात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक वास्तव्यास आहे. मात्र, आता ब्रिटिश सरकारने थेट भारताचा समावेश पंधरा देशांच्या यादीत केलाय. ज्यामध्ये गुन्हात दोषी आढळलेल्या व्यक्तीला सर्वात अगोदर त्यांच्या देशातून हद्दपार केले जाते. मुळात म्हणजे अमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या प्रश्नामुळे भारत चिंतेत असताना भारतावर अशाप्रकारची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावलाय. ब्रिटनला मिनी इंडिया म्हटले जाते. तिथे भारतीय लोकांचे मोठ्या संख्येत व्यवसाय आहेत. यासोबत नोकरीसाठीही भारतीय लोक तिथे मोठ्या संख्येने जातात.

सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.