चीनचं खरं रुप पुन्हा उजेडात, औषधांचे करार रद्द, कोविडशी संबंधित वस्तूच्या किमती प्रचंड वाढवल्या

चीनी पुरवठादारांनी कोविडशी संबंधित वस्तूंच्या किंमती 5 पटींनी वाढवल्या आहेत. इतकंच नाही तर औषधांचे अनेक कॉन्ट्रॅक्टही रद्द केले आहेत.

चीनचं खरं रुप पुन्हा उजेडात, औषधांचे करार रद्द, कोविडशी संबंधित वस्तूच्या किमती प्रचंड वाढवल्या
भारत आणि चीनचे राष्ट्रध्वज
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 9:32 PM

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. अशावेळी चीनने भारताला एक मोठा झटका दिलाय. चीनी पुरवठादारांनी कोविडशी संबंधित वस्तूंच्या किंमती 5 पटींनी वाढवल्या आहेत. इतकंच नाही तर औषधांचे अनेक कॉन्ट्रॅक्टही रद्द केले आहेत. चिनी पुरवठादारांनी भारतात पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमतीत 5 पटींनी वाढ केलीय. यापूर्वी मागील वर्षी चीनने व्हेंटिलेटर्सच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळी मात्र चीनने फक्त किमती वाढवल्या नाहीत तर औषधांच्या पुठवठ्याचे अनेक करार रद्द केले आहेत. (Cancellation of several drug contracts from China)

सरकारी उड्डाणांवर चीनकडून बंदी

चिनी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीन सरकारी उड्डाणांवरही बंद घालत आहे. ज्यामुळे भारतातला लागणाऱ्या गरजेच्या वस्तुंचा पुरवठा होणार नाही. हॉन्गकाँगमधील भारताचे काऊन्सिल जनरल प्रियंका चौहान यांनी चीनच्या या कृत्याचा विरोध दर्शवला आहे. पुरवठ्याच्या या साखळीबाबत चीनने असा निर्णय करायला नको होता. चीनच्या या कृत्यामुळे पुरवठ्याची साखळी बाधित होईल आणि कोविडशी संबंधित गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील, असं प्रियंका चौहान यांनी म्हटलंय.

200 डॉलरच्या वस्तू 1 हजार डॉलरवर पोहोचल्या

चीनने हे पाऊल उचलल्यामुळे कोविडशी संबंधित अनेक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. एखात्या वस्तूची किमत 200 डॉलर किमतीच्या 10 लीटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची किंमत 1 हजार डॉलरवर पोहोचली आहे. तर चिनी वृत्तपत्रांच्या म्हणण्यानुसार चीनच्या फार्मा पुरवठादाराने अचानक करार रद्द केले आहेत. आता चीनमधील फार्मा पुरवठादार रेमडेसिव्हीर आणि फेव्हिपिराविर अशा औषधांचा कच्चा माल लिलावाद्वारे विकत आहेत. तर चीन सरकारने सिच्युआन एअरलाईनच्या भारतातील 10 शहरांमधील उड्डाणावर बंदी आणली आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी अजून वाढणार आहेत.

शी जिनपिंग यांची राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म हुकणार?

चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांना लवकरच या पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे. अनेक जाणकार शी जिनपिंग यांना राष्ट्राध्यक्षपदाची तिसरी टर्म मिळणार नाही, असा अंदाज वर्तवताना दिसत आहेत. शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्या कार्यकाळात चीनने अनेक देशांच्या हद्दीत घुसखोरी केल्याचे प्रकार घडले आहेत. शी जिनपिंग यांच्या युद्धखोरीमुळे जागतिक पातळीवर चीन टीकेच्या भोवऱ्यात सापडला आहे. परिणामी शी जिनपिंग यांना आता फार काळ राष्ट्राध्यक्षपदी राहता येणार नाही, असे ठोकताळे जागतिक पातळीवर बांधले जात आहेत.

संबंधित बातम्या :

कोरोना संसर्ग हे चीनचं जैविक हत्यार?; सीक्रेट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा दावा

वादळी वाऱ्याने चीनच्या प्रसिद्ध Glass bridge चं नुकसान, पर्यटक 330 फुटांवर लटकतानाचा फोटो

Cancellation of several drug contracts from China

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.