कोरोना संसर्ग हे चीनचं जैविक हत्यार?; सीक्रेट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा दावा

कोरोना व्हायरसबाबत चीनने केलेल्या कोणत्याही दाव्याला जग मानायला तयार नाही. ज्या चीनमधून कोरोना व्हायरस निर्माण झाला आणि जगभर पसरला. (China probed weaponising coronaviruses in 2015, says US Reports)

कोरोना संसर्ग हे चीनचं जैविक हत्यार?; सीक्रेट कागदपत्रांच्या आधारे अमेरिकेचा दावा
coronavirus

वॉशिंग्टन: कोरोना व्हायरसबाबत चीनने केलेल्या कोणत्याही दाव्याला जग मानायला तयार नाही. ज्या चीनमधून कोरोना व्हायरस निर्माण झाला आणि जगभर पसरला. तो चीन सुरक्षित कसा? भारतासह संपूर्ण जग कोरोनाशी गेल्या दोन वर्षांपासून झुंज देत असताना अवघ्या 6 ते 8 महिन्यात चीनचं जनजीवन सुरळीत कसं झालं?, असा सवाल आता जगभरातून केला जात आहे. अमेरिकेच्या हाती तर काही सीक्रेट कागदपत्रे लागल्याने तर आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली आहे. (China probed weaponising coronaviruses in 2015, says US Reports)

अमेरिकेच्या हाती आलेल्या सीक्रेट कागदपत्रातून चीनवरील शंका आणि संशय अधिकच बळावला गेला आहे. 2015 मधील घटनाक्रमाशी संबंधित हा रिपोर्ट आहे. जेव्हा जगाला कोरोनाच्या घातक प्रभावाची माहिती नव्हती. तेव्हाच कोरोना व्हायरसचा हत्यार म्हणून वापर करण्यासाठी चीनची चाचपणी सुरू होती. चीनी सैन्याच्या वैज्ञानिकांनी तिसरे महायुद्ध जैविक हत्याराच्या माध्यमातून लढण्याची भविष्यवाणी केली होती. त्यामुळेही चीनवरील शंका बळावली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला मिळालेल्या गुप्त दस्ताऐवजांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे.

‘जैविक हत्याराचं नवं युग’

ब्रिटनच्या ‘द सन’मध्ये ही बातमी आली आहे. ‘द सन’ने ऑस्ट्रेलियाच्या ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राच्या आधारे हा दावा केला आहे. चिनी सैन्याचे पीएलए कमांडर या कुटील दाव्याची भविष्यवाणी करत असल्याचा दावाही या दस्ताऐवजांद्वारे करण्यात आला आहे. 2015 मध्ये सैन्य वैज्ञानिक आणि चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या कागदपत्रात माहिती दिली असून त्यात त्यांनी कोविड-19 ची माहिती मिळवत असल्याचं म्हटलं आहे. चिनी वैज्ञानिकांनी सार्स कोरोना व्हायरसला ‘जैविक हत्याराचं नवं युग’ म्हटलं आहे. कोविड त्यांचं उदाहरण आहे. एका जैविक हल्ल्याने शत्रूंच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवले जातील, असं त्यात म्हटलं आहे.

 

चीन काय म्हणाला?

पीएलएच्या या दस्ताऐवजात अमेरिकेच्या हवाई दलाचे कर्नल मायकल जे यांच्या अभ्यासाचाही उल्लेख केला आहे. तिसरे महायुद्ध जैविक हत्यारांनीच लढले जाणार असल्याचे मायकल यांनी म्हटलं होतं. 2003मध्ये ज्या सार्सचा चीनवर हल्ला झाला होता, ते जैविक हत्यारच असावं. दहशतवाद्यांनी ते तयार केलं असावं, असा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हा व्हायरस कृत्रिमपणे बदलता येऊ शकतो. मानवामध्ये आजार निर्माण करणाऱ्या संसर्गामध्ये तो बदलता येऊ शकतो. त्यानंतर जगाने कधीही पाहिलं नसेल असं हत्यार म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो, असंही त्यात म्हटलं आहे.

प्रतिमा मलिन करण्याची मोहीम

हे सीक्रेट दस्ताऐवज उघड झाल्यानंतर त्यावर ऑस्ट्रेलियन नेते जेम्स पिटरसन यांनी चिंता व्यक्त केली आहे. या दस्ताऐवजांमुळे कोरोना उत्पत्तीबाबत चीनच्या पारदर्शिकतेवर संशय व्यक्त केला जात आहे, असं पिटरसन यांनी म्हटलं आहे. तर हा लेख प्रकाशित केल्याबद्द्ल चीनने ‘द ऑस्ट्रेलियन’वर टीका केली आहे. चीनची प्रतिमा मलिन करण्याची ही मोहीम असल्याचं चीनने म्हटलं आहे. (China probed weaponising coronaviruses in 2015, says US Reports)

 

संबंधित बातम्या:

नुसत्या जाहिराती करून कोरोना संपणार नाही; नवाब मलिक यांचा केंद्राला टोला

अरेरे! ऑक्सिजन टँकर रस्ता चुकला अन् घात झाला; ICU वॉर्डमधील सात रुग्णांचा तडफडून मृत्यू

Corona Cases in India | कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

(China probed weaponising coronaviruses in 2015, says US Reports)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI