AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cancer Medicine : मोठी आनंदवार्ता, कॅन्सर छुमंतर होणार, रामबाण औषधाचा पर्याय, काय आहे रशियाचा दावा, किंमत वाचून दंग व्हाल…

Russia Cancer Vaccine : आता जगात कुणालाही कर्करोग होणार नाही. रशियाने यापूर्वीच, कॅन्सरवरील लस तयार करण्याच्या अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. आता कॅन्सरवरील रामबाण औषध तयार केल्याचा दावा रशियाने केला आहे. कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर लस बाजारात आल्यास सर्वांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Cancer Medicine : मोठी आनंदवार्ता, कॅन्सर छुमंतर होणार, रामबाण औषधाचा पर्याय, काय आहे रशियाचा दावा, किंमत वाचून दंग व्हाल...
रशिया कॅन्सर लस
| Updated on: Dec 18, 2024 | 11:28 AM
Share

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराबाबत रशियाने मोठा दावा केला आहे. कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. कॅन्सरवर लस तयार केल्याचा दावा करण्यात येत आहे. जगभरातील सर्व रुग्णांना ही लस मोफत देण्याचा दावा या देशाने केला आहे. या नवीन संशोधनामुळे कॅन्सर पीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरले आहे. लवकरच जगभरात हे औषध पोहचवण्यात येणार आहे. या औषधांचं नाव काय अथवा त्याचा वापर कसा करणार याविषयीची माहिती अद्याप रशियाने दिली नाही. पण ही लस शरिरातील कॅन्सरचा प्रभाव निष्प्रभ करते आणि त्याचा फैलाव होऊ देत नाही असे समोर येत आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस येणार

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, कॅन्सर विरोधात ही एक लस आहे. ही लस 2025 च्या सुरुवातीलाच बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख अँड्री काप्रिन यांनी या लसीविषयी माहिती दिली आहे. ही लस कॅन्सरवर किती प्रभावी ठरणार, कोणत्या कॅन्सरवर गुणकारी ठरणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही. कोणत्या वयाच्या रुग्णांवर त्याचा अधिक प्रभाव दिसेल याविषयीची माहिती काही दिवसात समोर येईल.

रशियात पण रुग्णांची मोठी संख्या

या वॅक्सिनचे, लसीचे नाव अद्याप समोर आलेले नाही. जगातील इतर देशांप्रमाणेच रशियात पण कॅन्सर ही मोठी समस्या आहे. कॅन्सरचे रूग्ण सातत्याने वाढत आहेत. 2022 मध्ये 6,35,000 हून अधिक रुग्णांची नोंद या काळात झाली आहे. या देशात स्तन, फुप्फुसांचा कर्करोग वाढला आहे. ही लस केवळ ट्युमरची गती कमी करणार नाही तर तिचा आकार सुद्धा कमी करेल.

काय होता पुतिन यांचा दावा?

काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी वैज्ञानिक कर्करोगावरील लस तयार करण्यात रशिया अगदी जवळ असल्याचा दावा केला होता. नवीन पिढीच्या इम्युनोमोड्युलेटरी औषधाची निर्मिती करत असल्याचे ते म्हणाले होते. इम्युनोमोड्युलेटरी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं औषध. ही लस शरीराला कर्करोग, संसर्ग अथवा इतर रोगांशी लढण्यास मतद करणारी असेल असा दावा आहे. मॉस्को फोरम ऑन फ्यूचर टेक्नॉलॉजीच्या मंचावरून त्यांनी या लसबद्दल घोषणा केली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.