जोडप्याचा कारच्या बोनटवर सेक्स, गुगलमुळे संपूर्ण जगाने 'तो' क्षण पाहिला

तैवानच्या डोंगर रांगांमध्ये निर्जन रस्त्यावर गाडीच्या बोनटवरच एक जोडपं लैंगिक संबंध (Couple sex on Car Bonnet) ठेवत असल्याचं समोर आलं आहे.

जोडप्याचा कारच्या बोनटवर सेक्स, गुगलमुळे संपूर्ण जगाने 'तो' क्षण पाहिला

ताइपे : तैवानच्या डोंगर रांगांमध्ये निर्जन रस्त्यावर गाडीच्या बोनटवरच एक जोडपं लैंगिक संबंध (Couple sex on Car Bonnet) ठेवत असल्याचं समोर आलं आहे. या जोडप्याला त्यावेळी आपण अगदी एकटं असल्याचं वाटलं आणि त्यांनी आजूबाजूला लक्षही दिलं नाही. मात्र, त्यांचा लैंगिक संबंध ठेवतानाचा फोटो (Taiwan Viral Photo) प्रचंड व्हायरल झाला. हा फोटो इतका व्हायरल झाला की थेट गुगललाच तो काढून टाकण्याची नामुष्की आली.

तैवानमध्ये गूगल स्ट्रीट व्यू कॅमेरातून (Google Street View Camera) रस्त्याचा एक फोटो घेण्यात आला होता. मात्र, या फोटोत रस्त्याच्या कडेला थांबलेलं एक जोडपं आक्षेपार्ह स्थितीत सापडलं. स्ट्रीट व्यू कॅमेरातून घेतलेल्या या फोटोत एक पुरुष आणि एक महिला नग्न आढळले. ते रस्त्याच्या कडेला आपल्या कारच्या बोनटवर लैंगिक संबंध ठेवत असताना फोटोत कैद झाले.

जगभरात गुगलच्या 360 डिग्री स्टीट व्यूच्या (Google 360 Street View) सुविधेचा उपयोग होतो. तैवानमधील हा फोटो देखील 360 डिग्रीतीलच होता. स्ट्रीट व्यूच्या या फोटोत समोरच्या बाजूला केवळ एक गाडी उभी असल्याचं दिसत आहे. मात्र, फोटोचं 360 डिग्री फीचर वापरल्यास त्यात जोडपं कारच्या बोनटवर लैंगिक संबंध ठेवत असल्याचं दिसलं.

हा फोटो समोर आल्यानंतर बराच वाद होत आहे. यामागे 2018 मधील गुगलच्या नग्नतेबाबच्या कठोर पावलांचाही संदर्भ आहे. गुगलने 2018 मध्ये नग्नतेवर अंकुश ठेवण्यासाठी आपल्या यंत्रणेत अनेक बदल केल्याचा दावा केला होता. मात्र, या जोडप्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर गुगलच्या या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

वेबसाइट डेली मेलने (यूके) दिलेल्या वृत्तानुसार तैवानमधील हा फोटो सर्वात आधी एका युजरने पाहिला. त्याने सांगितलं, ‘मी गुगलवरील या फोटोत काही प्राणी दिसतात का हे पाहात होतो. मात्र, अचानक मला जोडपं आक्षेपार्ह स्थितीत दिसलं आणि मला धक्काच बसला. गुगल मॅप आतापर्यंतचा सर्वात मोठा अविष्कार आहे.’

वादानंतर गुगलने फोटो हटवला

संबंधित फोटोचं एक ट्विट ट्विटरवर मोठ्या प्रमाणात शेअर केलं गेलं. त्यानंतर नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत गुगलने तात्काळ हा फोटो हटवला आहे. गुगलच्या प्रवक्त्यांनी संबंधित फोटो अश्लील श्रेणीतील असल्याने काढल्याचं सांगितलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *