AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन बनवतोय अमेरिकेपेक्षाही दहा पट मोठी ‘मिलिट्री सिटी’? तिसऱ्या महायुद्धाची ही तयारी तर नाही ना?

चीनची मिलिट्री सिटी बीजिंग शहरापासून 32 किलोमीटर दक्षिण-पश्चिममध्ये असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ चार किलोमीटर असणार आहे. त्यात बंकरसुद्धा असणार आहेत. हे बंकर अण्वस्त्र हल्लांना तोंड देण्यास सक्षम असणार आहे.

चीन बनवतोय अमेरिकेपेक्षाही दहा पट मोठी 'मिलिट्री सिटी'? तिसऱ्या महायुद्धाची ही तयारी तर नाही ना?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 03, 2025 | 11:39 AM
Share

गेल्या काही वर्षांत जागतिक परिस्थिती अस्थिर बनली आहे. सतत तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार जगात आहे. चीन आपली लष्करी ताकद वाढवत आहे. चीन अमेरिकेतील पेंटागॉनपेक्षा दहा पट मोठे मिलट्री सिटी बनवत आहे. बीजिंगच्या या मिलिटरी सिटीमध्ये तयार करण्यात येत असलेले बंकर अणुहल्ल्यालाही तोंड देण्यास सक्षम असणार आहेत. हे बंकर युद्धादरम्यान कमांड अँड कंट्रोल सेंटर म्हणूनही काम करू शकतात. आतापर्यंत पेंटागॉन ही जगातील सर्वात मोठी संरक्षण मंत्रालयाकडून चालवण्यात येणारी अधिकृत इमारत आहे. आता चीन त्यापेक्षा दहा पट मोठी सिटी तयार करत आहे. लष्करी तज्ज्ञ याला तिसऱ्या महायुद्धाची तयारी असल्याचे सांगत आहेत.

बीजिंग शहरापासून 32 किलोमीटर

मिलिट्री सिटी बीजिंग शहरापासून 32 किलोमीटर दक्षिण-पश्चिममध्ये असणार आहे. त्याचे क्षेत्रफळ चार किलोमीटर असणार आहे. त्यात बंकरसुद्धा असणार आहेत. हे बंकर अण्वस्त्र हल्लांना तोंड देण्यास सक्षम असणार आहे. सन 2022 मध्ये हा परिसर एक मैदान होता. सन 2024 च्या मध्यपर्यंत संपूर्ण परिसर स्वच्छ करुन रस्ते आणि बोगद्यांचे नेटवर्क तयार करण्यात आले. चीनने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.

चीनकडून गुप्तपणे काम सुरु

मीडिया रिपोर्टनुसार, मिलिट्री सिटी परिसरात ड्रोन उडवण्यास प्रतिबंध आहे. जवळ असणारे हायकिंग ट्रेल्स बंद करण्यात आले आहे. या भागात कॅमेरे किंवा इतर कोणत्याही प्रकारची टेहाळणी करण्यास बंदी घातली आहे. चीनने ही योजना पूर्णपणे गुप्त ठेवली आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, या भागात चीन सैनिक दिसत नाही. परंतु अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार, या ठिकाणी चीनचे कमांड सेंटर तयार होत आहे. शी जिनपिंग वेगाने आपले अण्वस्त्र भंडारही वाढत आहे. यामुळे नजीकच्या काळात अमेरिकेतील अण्वस्त्रांपेक्षा जास्त अण्वस्त्रे चीनकडे असण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, अण्वस्त्र हल्लापासून संरक्षण करण्यासाठी चीन बंकर निर्माण करत आहे. उपग्रहांच्या छायाचित्रानंतर सर्वात पहिली रिपोर्ट फायनेन्शियल टाइम्सने दिली होती. त्यात छायाचित्रांमध्ये या भागात मिलट्री सिटी तयार होत असल्याचे दिसत आहे. चीनच्या या हालचाली म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची तयारी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा