AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासोबत तणाव, चीनच्या अध्यक्षांना धडकी, जबरदस्तीने लाखो तरुणांची सैन्यात भरती

भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीमुळे LAC वर भारताची स्थिती मजबूत असल्याचा अहवाल कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्ठमंडळाने दिल्याने चीनच्या राष्ट्राध्यक्षांना धडकी भरली आहे. यामुळे पीएलएमध्ये लाखो तरुणांची भरती सुरू करण्यात आलीय. China forces to youth for join PLA due to fear of India America friendship

भारतासोबत तणाव, चीनच्या अध्यक्षांना धडकी, जबरदस्तीने लाखो तरुणांची सैन्यात भरती
| Updated on: Sep 28, 2020 | 5:12 PM
Share

नवी दिल्ली; लडाख सीमेवरील (Ladakh Border Issue) भारताच्या तयारीमुळे चीन अस्वस्थ झालाय. भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीमुळे ‘लाईन ऑफ अ‌ॅक्शन’ (LAC) वर भारताची स्थिती मजबूत असल्याची माहिती तज्ज्ञांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (XI Jinping) यांना दिली आहे.  या कारणांमुळे चीनमध्ये जबरदस्तीने लाखो तरुणांची सैन्यात भरती करण्यात येत असल्याची माहिती आहे. (China forces to youth for join PLA due to fear of India America friendship)

मिळालेल्या माहितीनुसार,कम्यनिस्ट पार्टीमधील भारत विषयक घडामोंडीची माहिती असणाऱ्या लोकांना LAC( लाईन ऑफ अ‌ॅक्शन) च्या विविध भागात दौऱ्यावर पाठवले होते. यामधील एका सदस्याने चायनीज पत्रिका या संस्थेला मुलाखत दिली. त्यातून ही माहिती उघडकीस आली.

भारत-अमेरिका संबंधामुळे चीन भयभीत

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या काही सदस्यांनी LAC चा दौरा केला होता. चीनसाठी अमेरिका सर्वात जास्त धोकादायक होता. मात्र, भारत आणि अमेरिका एक झाले आहेत. यामुळे LAC वर अनेक ठिकाणी भारतची स्थिती मजबूत झालीय, असा अहवाल कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांनी दिल्याने चीन भयभीत झाल्याची माहिती आहे.

जबरदस्तीने लाखो युवकांची सैन्यात भरती

चीनचे सैन्य पब्लिक लिबरेशन आर्मी (PLA)मध्ये दरवर्षी 4 ते 5 लाख तरुण सैन्यात भरती होतात. यावर्षी विद्यापीठांतून जबरदस्तीने 30 लाख पदवीधर विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत. दरम्यान, 15 जूनला पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्यांसोबत झालेल्या झटापटीत चीनने 5 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे.

कमांडर स्तरावरील चर्चेची 7 वी फेरी

गलवानमध्ये भारत-चीनच्या सैन्यात झटापटीच्या पार्श्वभूमीवर कमांडर स्तरावरील चर्चेची 7 वी फेरीतील बैठक या आठवड्यात होणार आहे. भारत-चीन सीमाविषयक मुद्यांवर विचार विनिमय आणि समन्वय ठेवण्यासाठी ही बैठक होत आहे. दरम्यान, या चर्चेपूर्वी ‘लाईन ऑफ अ‌ॅक्शन’ वर चीनकडून कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

चीनची घुसखोरी थांबेना, मित्र असलेल्या नेपाळमध्येही जमीन लाटली

‘ती घुसखोरी तैवानवर कब्जा करण्यासाठीच’, ग्लोबल टाईम्समधून चीनचा धक्कादायक खुलासा

(China forces to youth for join PLA due to fear of India America friendship)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.