चीनने केला मोठा जुगाड, स्टील्थ फायटर जेट विमानांना असे केले दुरुस्त की अमेरिकाही हडबडला
चीनने अलिकडेच गुळगुळीत थर असलेल्या अत्याधुनिक स्टील्थ तंत्राचा लवचिकपणा कायम राखण्यासाठी 3000 हजार वर्षे जुन्या रेशीम विणण्याच्या कलेचा वापर केल्याने अमेरिकेलाही धक्का बसला आहे.

चीन आता अमेरिकेच्या पावलावर पाऊल टाकून सुपरपॉवर होत चालला आहे. चीनने अलिकडेच पाचव्या पिढीचे फायटर स्टील्थ जेट विकसित केले आहे. परंतू पाचव्या पिढीची स्टील्थ विमाने रडारावर दिसत नाहीत. त्यामुळे त्यांना जगात प्रचंड मागणी, सध्या जगात केवळ दोनच देशांकडे स्टील्थ विमाने आहेत. पाकिस्तान देखील ही स्टील्थ विमाने विकत घेण्याच्या तयारीत आहेत तर तुर्की या विमानांचा विकास करण्याच्या अत्यंत जवळ पोहचला आहे. भारताने जर वेळीच स्टील्थ विमाने विकत घेतली नाहीत तर भारत मागे पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अशात आता जे सुपरपॉवर अमेरिकेला जमले नाही ते चीनने करुन दाखविल्याने अमेरिकेला देखील हादरा बसला आहे.
स्टील्थ जेट फायटर रडारवर जरा देखील दिसत नाहीत. परंतू या विमानाच्या स्टील्थ तंत्रासाठी आवश्यक कोटींगला काही काळाने चिरा पडतात. त्यामुळे स्टील्थ क्षमता घटत आहे. अमेरिकेकडे एफ-22 सारख्या स्टील्थ विमानांना समस्या सुरु झाली आहे. अमेरिकेचे एफ – 22 रॅप्टर सारखे स्टील्थ विमानाचे रडार शोषक कोटिंग्स नष्ट होण्याची समस्या सुरु झाली आहे. यामुळे विमानांना रडारवरुन लुप्त होण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यातच चीनने त्यांच्या पाचव्या पिढीच्या जेट विमानांच्या स्टील्थ कोटींग नष्ट होण्याच्या समस्येवर तोडगा काढल्याचा दावा केला आहे.
3000 वर्षे जुन्या तंत्राने चीनने जुगाड केला
चीनने आपल्याकडील तीन हजार वर्षे जुन्या रेशीम विणण्याच्या कलेने या समस्येतून सुटका मिळविली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे.अमेरिकेच्या एफ-35 आणि एफ-22 विमानांच्या स्टील्थ कोटींगला उड्डाण करताना असताना नुकसान होत आहे. त्यामुळे विमानांचे स्टील्थ क्षमता घटत चालली आहे.




स्टील्थ कोटींग कसे होतंय नुकसान
स्टील्थ जेट फायटर ध्वनीच्या दुप्पट तिप्पट वेगाने उडत असताना वाळवंटातील वाळूच्या वादळांनी देखील त्यांना चरे पडत आहेत. घर्षणाने साध्या खरचटण्यानेही स्टील्थ विमानांचा थर खराब होत आहे.त्यामुळे रडारावरुन लुप्त होण्याचा तंत्राला धक्का पोहचत आहे. रडारावरुन नाहीसा होण्याचा त्यांचा गुणधर्म नष्ट होत आहे. त्यामुळे चालक दलाला दर तीन आठवड्यानंतर रडार शोषक सामग्रीला पुन्हा लावावे लागत आहे. त्याचा खर्च प्रति उड्डाण तास ६० हजार अमेरिकन डॉलर इतका मोठा आहे. तसेच फ्लोरिडा येथील आद्रता देखील विमानाच्या संरक्षक कवचाला धोका पोहचवत आहे. त्यामुळे सीमाभागात लढाईच्या गुणवत्तेवर त्याचा विपरित परिणाम होत आहे.
हान राजघराण्यापासून रेशम विणण्याचा प्रघात
उत्तर हान राजवंश (206 ईसा पूर्व-220 ईस्वी) काळातील जॅक्वार्ड लूमने प्रेरणा घेत रेशम विणण्याचा तंत्राचा विकास झाला आहे. हे तंत्रज्ञान ईसवीसन 200 सालातील आहे. या रेशीम विणण्याच्या पद्धतीचा आता वापर आता होत आहे. चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन (CASIC) आणि तियांगोंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 8-26GHz स्पेक्ट्रममध्ये 90.6 टक्के रडार लहरी शोषून घेणाऱ्या वॉर्प-निटेड “टू-साइडेड जॅकवर्ड” स्ट्रक्चरमध्ये वाहक धागे एकत्रित करून एक मटेरियल तयार केले आहे, जे पारंपारिक कोटिंग्जपेक्षा चांगले काम करत आहे.