
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतापाठोपाठ चीनवरही 100 टक्के टॅरिफ लावला. चीनने दुर्मिळ खनिजांवर निर्यात लावल्याने आपण त्यांच्यावर हा टॅरिफ लावत असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून केली जाणार आहे. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चीन सहमत असल्याने अमेरिका चीनवर टॅरिफ लावणार नसल्याचे संकेत असतानाच आता पुन्हा एकदा गोष्टी तणावात आल्याचे बघायला मिळतंय. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था एकमेकांच्या विरोधात उभ्या असल्याने याची झळ सर्व जगाला बसण्याचे संकेत आहेत. आता चीन अमेरिकेवर चांगलाच भडकला. चीनवर खरोखरच 100 टक्के टॅरिफ लागणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
अमेरिकेच्या व्यापार समितीचे सदस्य स्कॉट बेसेंट यांनी म्हटले की, चीनसोबत काही गोष्टींवर आमची सहमती नक्कीच झालीये. ज्यामुळे त्यांच्यावर 100 टक्के टॅरिफचा धोका नक्कीच नाही. चीनचे उपप्रधानमंत्री ली कियांगने सोमवारी अप्रत्यक्षपणे टीका करत म्हटले की, व्यापाराच्या मुद्द्यावर जगाला जंगल कायद्याकडे गेले नाही पाहिजे. हा अत्यंत मोठा टोला चीनने अमेरिकेला लगावला असून चीन चांगलाच भडकला आहे.
एएफपीच्या रिपोर्टनुसार, कियांगने आर्थिक जागतिकीकरण आणि जागतिकीकरण राजनितीवरील भविष्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, आर्थिक जागतिकीकरण हे कधीही परिवर्तन होणारे नाहीये. जगाने जंगलाच्या या कायद्याकडे कधीच गेले नाही पाहिजे, जिथे कमजोर लोकांना धमकावले जाते. ज्याप्रकारे मागील काही दिवसांपासून व्यापाराच्या मुद्द्यावर अमेरिका इतर देशांना धमकावत आहे, ज्यामध्ये चीनसह भारत आणि जगातील अनेक देश आहेत.
सध्या डोनाल्ड ट्रम्प हे आशियाच्या दाैऱ्यावर असून ते दक्षिण कोरियामध्ये चीनसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये सर्व करारावर सहमती करण्यासाठी प्रयत्न केली जातील. ज्यामुळे दोन्ही देशांमधील टॅरिफचे युद्ध संपेल. ज्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना याबद्दल विचारण्यात आले असताना त्यांनी म्हटले की, मला आशा आहे की शी जिनपिंग यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये सर्व करार होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान जपानला रवाना होण्याच्या अगोदर केले.