अमेरिकेविरोधात चीनची मोठी खेळी, कोट्यावधींचे नुकसान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती तुरी, डाव उलटा, भारतही..

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लावला. डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेत होणारी निर्यात कमी झालीये. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात मोठा गेम चीनने केलाय.

अमेरिकेविरोधात चीनची मोठी खेळी, कोट्यावधींचे नुकसान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती तुरी, डाव उलटा, भारतही..
Donald Trump and Xi Jinping
| Updated on: Nov 06, 2025 | 9:17 AM

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत अमेरिकेतील संबंध तणावात आहेत. भारतावर विविध प्रकारे निर्बंध लादण्याचे काम अमेरिका करत आहे. हेच नाही तर भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत आणि अमेरिका व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याचेही बोलले जातंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात असून दोन्ही देशांमधील संबंध चांगले आहेत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर टॅरिफ लादल्याचे अमेरिकेकडून सांगितले जाते. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, याकरिता धमकावले जात आहे. मात्र, भारतापेक्षा कितीतरी पट अधिक रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या चीनवर अमेरिका मेहरबान आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यातीलही व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात  व्यापारी तणाव बऱ्याच काळापासून सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची दक्षिण कोरियातील बुसान येथे भेट झाल्यावर अखेर हा तणाव संपला. नरेंद्र मोदी यांच्यासोबतच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा शी जिनपिंग यांचे कौतुक केले. चीनला टॅरिफची धमकी देणारी अमेरिका आता त्यांचे काैतुक करत आहे.

अमेरिका चीनसोबत मैत्री करण्यासाठी एक पाऊस मागे घेत असतानाच आता शी जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मोठा गेम खेळला. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर चीनने बुधवारी स्पष्ट केले की ते अमेरिकेच्या आयातीवरील, ज्यामध्ये कृषी मालाचा समावेश आहे, प्रत्युत्तरात्मक शुल्क स्थगित करेल. मात्र, इथेच त्यांनी मोठा गेम खेळला. कृषी मालावरील शुल्क स्थगित केले असले तरीही त्यांनी अमेरिकन सोयाबीन आयातीवरील 13 टक्के टॅरिफ अजूनही सुरू ठेवला आहे.

टॅरिफ कमिशनने 10 नोव्हेंबरपासून काही अमेरिकन कृषी वस्तूंवर लादलेले 15 टक्के पर्यंतचे टॅरिफ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. टॅरिफला प्रतिसाद म्हणून लादलेला 10 टक्के टॅरिफ कायम ठेवला. अमेरिका जरी चीनबद्दल मवाळ भूमिका घेत असली तरीही चीन अमेरिकेच्या विरोधात कारवाई करताना दिसतोय. चीनवर अमेरिका 100 टक्के टॅरिफ लावणार नसल्याचेही आता स्पष्ट आहे.