AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत, चीन आणि तुर्की हतबल, डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव रशियाच्या मुळावर, तब्बल इतके…

अमेरिका आणि रशियातील वाद पेटला असून यामध्ये जगातील अनेक देश भरडली जात आहेत. अमेरिकेने आदेश काढून रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यांवर बंदी घातली. आता त्याची झळ भारताला बसत आहे.

भारत, चीन आणि तुर्की हतबल, डोनाल्ड ट्रम्प यांचा डाव रशियाच्या मुळावर, तब्बल इतके...
Russian oil companies
| Updated on: Nov 05, 2025 | 2:14 PM
Share

रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अमेरिका भारतासह अनेक देशांवर दबाव आणत आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना रशियाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसलायचा आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानेच भारतावर 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत, चीन आणि तुर्कीने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता यामुळे विविध प्रकारे रशियातून होणारी तेल निर्यात अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे डाव अमेरिकेकडून टाकली जात आहेत. मोठ्या प्रमाणात अमेरिकेमुळे रशियातील तेल निर्यातीवर परिणाम झाल्याचे येणाऱ्या आकड्यांवरून स्पष्ट दिसतंय. मोठ्या दोन रशियन तेल कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली. त्यापैकी दोन्ही कंपन्या भारत, चीनला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल निर्यात करत.

रशियाकडून होणाऱ्या समुद्री कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात झपाट्याने घट झाली. धक्कादायक म्हणजे जानेवारील 2024 नंतर ही सर्वात मोठी घट म्हणावी लागेल. अमेरिकेच्या नवीन निर्बंधांमुळे प्रमुख खरेदीदार भारत, चीन आणि तुर्की रशियन तेलापासून दूर जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल कंपन्यांवर काही निर्बंध लादली आहेत. ज्याचा थेट परिणाम भारत, चीन आणि तुर्कीवर होताना दिसतोय.

मालवाहतुकीपेक्षा जहाजांमधून माल उतरवण्यावर जास्त परिणाम झाला आहे, ज्यामुळे समुद्रात तेलाचा साठा वाढत आहे. ब्लूमबर्ग शिप ट्रॅकिंग डेटानुसार, 2 नोव्हेंबरपर्यंतच्या चार आठवड्यात रशियन बंदरांमधून दररोज सरासरी 3.58 दशलक्ष बॅरल तेल बाहेर पडले. 26 ऑक्टोबरपर्यंतच्या सुधारित आकड्यांपेक्षा हे सुमारे 1.9 दशलक्ष बॅरल कमी आहे. सतत ही तफावत वाढताना दिसत आहे.

रशियन तेल उत्पन्नातही घट झाली आहे, रशियाच्या दोन सर्वात मोठ्या तेल कंपन्यां, रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यासोबतच्या व्यापारावर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर भारतीय तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी कमी केली. पुढील काही दिवस परिस्थिती अशीच राहिली तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, असे दिसतंय. अमेरिका रशियन तेल कंपन्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे. अमेरिका पुढील काही दिवसात अजून कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय. ज्याचा परिणाम पूर्ण जगावर होण्याचे संकेत आहेत.

एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?.
NCP आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं? पुढील सुनावणी कधी?
NCP आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत काय घडलं? पुढील सुनावणी कधी?.
ठरलं, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन? आता इतिहास घडणार?
ठरलं, आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन? आता इतिहास घडणार?.
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?
दिल्ली स्फोटाचा तपास मराठी माणसाकडे, कोण आहेत मराठमोळे ADG विजय साखरे?.
जरांगेंच्या हत्येचा कोणी रचला कट? धागेदोरे उघड, पोलिसांकडून ऐकाला अटक
जरांगेंच्या हत्येचा कोणी रचला कट? धागेदोरे उघड, पोलिसांकडून ऐकाला अटक.
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना
बिबट्याची दहशत लैच बेक्कार! या जिल्ह्यात पोरं वेल सेटल पण बायको मिळेना.
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू...
स्टेजवर हे काय? नवरा-नवरीला भेटण्यास गर्दी अन् त्यांनी काढला चाकू....
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्..
दिल्लीच्या स्फोटाचा नवा व्हिडीओ, ब्लास्ट होताच CCTV डायरेक्ट बंद अन्...
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप
भयानक... अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करत दमानियांचा गंभीर आरोप.
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण..
आधी रेकी अन् 26 जानेवारीला लाल किल्ला टार्गेट करण्याचा दोघांचा कट पण...