AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत चीन सीमेवर मोठ्या घडामोडी, चीनचा थेट निर्णय, जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर..

भारत आणि चीन यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. मात्र, चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. भारत आणि चीन यांच्यातील संबंध पुन्हा एकदा सुधारताना दिसत आहेत. त्यातच आता मोठी माहिती पुढे आली.

भारत चीन सीमेवर मोठ्या घडामोडी, चीनचा थेट निर्णय, जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर..
india china border Xi Jinping
| Updated on: Sep 14, 2026 | 10:23 AM
Share

ब्रिक्स परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी.जिनपिंग भारत दाैऱ्यावर आले. तब्बल 7 वर्षानंतर जिनपिंग भारतात आले. गलवान येथील संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील संबंध तणावात होते. गेल्या काही दिवसांचा तणाव विसरून भारत आणि चीनने नव्या मैत्रीच्या अध्यायाला सुरूवात केली. जिनपिंग यांच्या भारत भेटीनंतर भारत-चीन सीमेबाबत मोठी बातमी बातमी पुढे येतंय. चीन गेल्या काही दिवसांपासून भारताच्या सीमेवर सैन्य वाढवताना दिसले. एलएसीच्या सर्व सेक्टरमध्ये भारतीय सैन्याची मजबूत पकड आहे. ब्रिक्समध्ये चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी नुकतीच भेट दिल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाने एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केलाय. 2025 मध्ये उत्तर सीमांवर चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी अर्थात PLAने सैन्य घटवल्याचं या अहवालातून सांगण्यात आलंय.

2025-26 या वर्षाच्या अहवालातून संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मात्र, भारताने LAC च्या सर्व सेक्टरमध्ये आपली सैन्य तैनाती मजबूत ठेवली असून कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलंय. सध्या उत्तर सीमांवर आणि पारंपरिक प्रशिक्षण क्षेत्रांमध्ये सुमारे 10 कंबाइंड आर्म्स ब्रिगेडच्या बरोबरीचे सैन्यबळ तैनात आहे.

भारत आणि चीनदरम्यान सकारात्मक राजकीय, राजनैतिक आणि लष्करी स्तरावरील चर्चेमुळे उत्तर सीमांवरील परिस्थितीत अधिक स्थैर्य आल्याचा या अहवालात उल्लेख दिसतोय. दोन्ही देशांदरम्यान लष्करी चर्चेच्या माध्यमातून सीमेवरील प्रश्न सोडवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.बैठकांचं वातावरण सौहार्दपूर्ण असून दोन्ही बाजूंशी संबंधित मुद्दे मांडले आणि सोडवले जात आहेत, असं संरक्षण मंत्रालयाच्या अहवालात म्हटलंय

15 जून 2020 रोजी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. त्यानंतर पँगाँग त्सो, गोगरा-हॉट स्प्रिंग्स आणि इतर भागात मोठ्या प्रमाणावर सैन्याची तैनाती झाली. पुढे 9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील यांग्त्से, तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या दोन्ही घटनांनंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी दोन्ही स्तरावर बैठका झाल्या, चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता तणाव निवळल्याचं दिसतंय

शनिवारी ब्रिक्स परिषदेसाठी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले होते, ते कालच बिजिंगला परतले. ब्रिक्स परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबाबत जिनपिंग यांनी भारताचं आणि मोदींचं अभिनंदन केलं. तसंच चीन आणि भारताने भागीदार असायला हवे, असं मतही नोंदवलं, आता जिनपिंग परतल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाचा अहवाल समोर आला असून त्यात LACवरील सैन्य घटवल्याचं स्पष्टपणे नमूद आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच