VIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच ‘गिळलं’, पाहा भयानक व्हिडीओ

एखाद्या हॉलिवडू चित्रपटात दिसावे तसे हे वादळ वाटत होते. वादळामुळे आकाश केशरी झाले होते, तसेच सूर्यसुद्धा लपला होता.

VIDEO: चिनी शहराला 300 फूट उंच वाळूच्या वादळानंच 'गिळलं', पाहा भयानक व्हिडीओ
Dunhuang Sand Wall Video
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 5:32 PM

बीजिंग: गोबी वाळवंटात उद्भवलेलं चीनमधील वाळूचे वादळ संपण्याचं नाव घेत नाहीये. ताज्या घटनेत दूनहआंग शहरातील 300 फुटांपेक्षा जास्त उंच वाळूच्या वादळानं संपूर्ण शहर व्यापून टाकलेय. अशी स्थिती झालीय की, संपूर्ण शहर दिसू त्या वादळात हरवून गेलेय. एखाद्या हॉलिवडू चित्रपटात दिसावे तसे हे वादळ वाटत होते. वादळामुळे आकाश केशरी झाले होते, तसेच सूर्यसुद्धा लपला होता.

रविवारी गोबी वाळवंटातून वाळूचे हे मोठे वादळ उठले

रविवारी गोबी वाळवंटातून वाळूचे हे मोठे वादळ उठल्याचे सांगण्यात येत आहे. या वादळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला गेलाय. असे दिसते आहे की, जेव्हा वादळ शहरात घुसले तेव्हा अगदी उंच इमारती वादळात दिसेनाशा झाल्या होत्या. वाळूच्या वादळानंतर पोलिसांनी सर्व मोठे रस्ते बंद करून लोकांची हालचाल थांबवली.

‘ अन् अचानक वाळूचे वादळ आले’

वाळूमुळे दृश्यमानता 20 फुटांवर गेली. दक्षिण चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी तीन वाजता प्राचीन सिल्‍क रूटवर वसलेल्या शहराला या वादळाचा तडाखा बसला. जवळच्या पार्कमधील पर्यटकांना वादळाबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि त्यांचे सर्व सामान धुळीच्या वादळाने उडून गेले. हा पर्यटकांचा गट मिंग्शा माऊंटन आणि क्रेसेंट लेक पार्कवर गेला.

स्वतःला वाचवण्यासाठी चष्मा आणि मास्कचा आधार

पर्यटकांना वाळूच्या वादळापासून स्वतःला वाचवण्यासाठी चष्मा आणि मास्क घालावे लागले. टूर गाईडने सांगितले की, निळे आकाश पाहून आम्हाला वाटले की, आपणाला एक सुंदर संध्याकाळ पाहायला मिळेल, परंतु अचानक वाळूचे वादळ आले. हे वादळ काही काळ राहिल्यानंतर शांत झाले. चीनचे हे शहर खराब हवामान आणि राहणीमानासाठी प्रसिद्ध आहे. तसेच हे शहर युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.

संबंधित बातम्या

जपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय?

तालिबानच्या मुसक्या आवळण्यासाठी तजाकिस्तानसह रशियाचा अॅक्शन प्लॅन

Chinese city ‘swallowed’ by 300-foot-high sandstorm, watch horrific video

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.