जपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय?

जेव्हा केव्हा चाकूचा विषय निघतो तेव्हा जपानी चाकूचा उल्लेख होतोच होतो. अनेक व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर या चाकूचे व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे या चाकूची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल 65 हजार रुपये आहे.

जपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय?


टोकियो : जेव्हा केव्हा चाकूचा विषय निघतो तेव्हा जपानी चाकूचा उल्लेख होतोच होतो. अनेक व्हिडीओ प्लॅटफॉर्मवर या चाकूचे व्हिडीओ कायमच व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे या चाकूची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल 65 हजार रुपये आहे. एका चाकूसाठी इतके पैसे कोण मोजतं असाही प्रश्न तुमच्या मनात येईल. पण जपानच्या या चाकुची किंमत केवळ जास्त नाही, तर त्याची वैशिष्ट्ये देखील आहेत. म्हणूनच इतका महागडा चाकू असतानाही त्याला जगभरातून मागणी आहे. आज जाणून घेऊयात या चाकूची खास बात.

जपानमधील हॉटेलमध्ये वापरण्यात येणारे चाकू हे अतिशय धारधार असतात. या चाकूने अतिशय कठीण, टणक वस्तूही सहज कापता येते. यामुळे अनेक जणांना हे चाकू खरेदी करायचे असतात. या चाकूंची किंमतही खूप असते. साधारण 900 ते 1000 डॉलरला एक चाकू मिळतो. म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर एका चाकुसाठी तब्बल 65 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात.

जपानी चाकू इतका प्रसिद्ध का?

बिजनेस इनसाइडरच्या एका रिपोर्टनुसार, जपानी शेफ वापरतात त्या चाकूची डिझाईन खूप खास असते. यामुळे या चाकूंना खूप धार असते. या चाकूचा उपयोग करुन कोणतीही गोष्ट सहज कापता येते. यामुळेच जगभरातील टॉपच्या रेस्टोरंटमध्ये या चाकूची मागणी असते. तसेच चाकूवर करण्याच येणारे नक्षीकामही वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणूनच जे चाकू जगभरात प्रसिद्ध आहेत.

हेही वाचा :

वयाच्या 22 व्या वर्षी 11 मुलं, करोडो रुपयांची संपत्ती असलेल्या जोडीला हवे आहेत तब्बल 105 मुलं !

Video | ICSE, ISC बोर्डाचा 10 वी,12 वीचा निकाल जाहीर, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Video | घनदाट जंगलातून वाहनांची ये-जा, मध्येच अस्वलं आलं, पुढे काय झालं ? एकदा पाहाच !

व्हिडीओ पाहा :

Know all about Japanese Knife why it is so exepensive

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI