AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 15 देशांचा भारताला पाठिंबा, मोठ्या घडामोडी, अमेरिका आणि चीन…

गेल्या काही दिवसांपासून भारत अमेरिका संबंध तणावात आहेत. आता भारताच्या समर्थनार्थ तब्बल 15 देश मैदानात आली आहेत. मोठ्या घडामोडी सध्या सुरू असून भारताचे थेट समर्थन करताना महत्वाचे देश दिसत आहेत.

तब्बल 15 देशांचा भारताला पाठिंबा, मोठ्या घडामोडी, अमेरिका आणि चीन...
15 countries support India
| Updated on: Nov 15, 2025 | 7:00 PM
Share

10 नोव्हेंबर 2025 च्या सायंकाळी मोठा स्फोट दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झाला. सुरूवातीला हा स्फोट असल्याचे सांगितले गेले. मात्र, याची धागेदोरे विदेशात पोहोचली आणि एकच खळबळ उडाली. चक्क काही डॉक्टरांचा समावेश या स्फोटात असल्याचे पुढे आले. i-20 गाडीत स्फोटके भरली होती आणि मोठा घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. मात्र,  घाईगडीत लाल किल्ल्याजवळ भर रस्त्यामध्ये हा स्फोट झाला. पुलवामातील दहशतवादी उमर गाडीत होता आणि त्यानेच हा स्फोट घडवला. ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी उमर हा स्वत: गाडीत होता. त्याच्या कुटुंबियांशी त्याचा DNA 100 टक्के जुळला. गेल्या काही दिवसांपासून या हल्ल्याचे प्लॅनिंग सुरू होते. महिला डॉक्टर शाहीन सईद थेट दहशतवाद्यांचा संपर्कात होती. हेच नाही तर उमर कट्टरपंथी बनल्याची कल्पना त्याच्या कुटुंबियांना होती. मात्र, त्यांनी याची माहिती यंत्रणांना दिली नाही.

या हल्ल्यानंतर आर्मीने चक्क उमरचे पुलवामातील घर उडवून दिले आणि त्याच्या कुटुंबियांची कसून चाैकशी सुरू आहे. 20 पेक्षा अधिक लोक या हल्ल्यात गंभीर जखमी झाले तर 9 जणांचा जीव गेला. भारताने स्पष्ट केले की, हा बॉम्बस्फोट आहे. असूनही चाैकशी सुरू आहे. यादरम्यान अनेक देश भारतासाठी मैदानात आल्याचे बघायला मिळाले. जवळपास 15 देशांनी भारताचे समर्थन करत बाजू घेतली. ज्यामध्ये अमेरिका आणि चीनचा देखील समावेश आहे.

चीन, अमेरिका, कॅनडा, मलेशिया, इस्रायल, मिस्त्र, नेपाळ, जपान, अफगाणिस्तान, इराण, तुर्की, दक्षिण कोरिया, क्यूबा, साइप्रस, श्रीलंका या देशाने संवेदना व्यक्त करत भारताच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केल्या. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून ट्विट केले. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, इस्रायलचे लोक पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतात. या दुःखाच्या वेळी इस्रायल भारतासोबत खंबीरपणे उभा नक्कीच आहे.

या बॉम्बस्फोटानंतर अमेरिकेने देखील स्पष्ट केले की, आम्ही भारतातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. अमेरिकन दूतावासांनी त्यांच्या नागरिकांना लाल किल्ला आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून दूर राहण्यास सांगितले. भारतात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळाले.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…