AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-Israel War : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने जे केलं, तेच आता इराण करतोय, दोघांमध्ये फरक काय?

Iran-Israel War : सध्या सुरु असलेल्या इस्रायल-इराण युद्धामध्ये काही गोष्टी दिसून येत आहेत. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने जे केलं, तेच आता इराण करतोय. दोघांमध्ये फरक काय? असा प्रश्न यातून निर्माण होतो. इराणने निश्चित काही प्रमाणात इस्रायलला हानी पोहोचवली आहे. कुठलही युद्ध हे जिवीत व वित्तहानीशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येक युद्धाच एक उद्दिष्टय असतं.

Iran-Israel War : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानने जे केलं, तेच आता इराण करतोय, दोघांमध्ये फरक काय?
operation sindoor
| Updated on: Jun 16, 2025 | 2:02 PM
Share

ऑपरेशन रायजिग लायन सुरु झाल्यापासून इस्रायल-इराणमध्ये भीषण युद्ध भडकलं आहे. इस्रायलने या युद्धाची सुरुवात केली. इराण अणूबॉम्ब बनवण्याच्या जवळ पोहोचल्यामुळे इस्रायलने इराणमध्ये घुसून हल्ले केले. त्यांचे अणवस्त्र तळ, बॅलेस्टिक मिसाइल्स उत्पादनाचे कारखाने, अणवस्त्र वैज्ञानिक आणि बडया लष्करी अधिकाऱ्यांना संपवलं. इस्रायलने हा हल्ला करुन इराणला मोठा झटका दिला. त्यानंतर इराणने ‘ट्रू प्रॉमिस 3’ द्वारे इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं. शुक्रवारपासून दोन्ही देशांमध्ये भीषण युद्ध भडकलं आहे. परस्परावर जोरदार मिसाइल हल्ले सुरु आहेत. आतापर्यंत या भीषण युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा मोठा आहे.

या युद्धा दरम्यान एक गोष्ट लक्षात आलीय. इराणने निश्चित इस्रायलला धक्का दिला आहे. कदाचित इस्रायलचा जो अंदाज होता, त्यापेक्षा त्यांचं जास्त नुकसान झालय. म्हणजे इराणकडे सुद्धा इस्रायलला जखमी करण्याइतपत घातक शस्त्र आहेत. पण यात एक फरक आहे, तो म्हणजे इस्रायलने ठरवून अण्विक आणि लष्करी तळांना टार्गेट केलं. जे उद्दिष्टय होतं, ते साध्य केलं. याउलट इराणला इस्रायलच्या लष्करी सामर्थ्याला धक्का द्यायचा आहे. पण त्यांना ते जमत नाहीय. इस्रायलच्या बाजूला जिवीतहानीचा आकडा कमी आहे. त्याशिवाय त्यांचं मोठ लष्करी नुकसान झाल्याच सिद्ध झालेलं नाही.

इराण-पाकिस्तानमध्ये काही फरक नाही

इराणकडून इस्रायलमध्ये जे हल्ले होतायत, त्यात अनेक इमारती कोसळल्याच दिसत आहे. गाझा पट्टीत जे चित्र होतं, तस इस्रायलमध्ये दिसतय. पण फरक हा आहे की, इराणने इस्रायलच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य बनवलय. ते इस्रायलच्या लष्करी तळांना टार्गेट बनवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांना ते जमत नाहीय. म्हणून ते सर्वसामान्यांच्या घरावर हल्ले करत आहेत. हेच ऑपेरशन सिंदूरच्यावेळी दिसून आलं होते. भारताने सुरुवातीला फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने तो आपल्यावरचा हल्ला मानला. त्यांनी भारताच्या सैन्य ठिकाणांवर आणि नागरी वस्त्यांवर हल्ले केले.

म्हणून पाकिस्तानला जगापासून सत्य लपवता आलं

जम्मू-काश्मीरमध्ये निरपराध नागरिकांच्या घरावर तोफगोळे डागले. यात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. याउलट भारताने फक्त सैन्य ठिकाणांना टार्गेट केलं. पाकिस्तानची हार होऊन पण त्यांनी विजयाचे ढोल बडवले. कारण पाकिस्तानने त्यांच्या एअर बेसेसवर मीडियाला जाऊ दिलं नाही. अन्यथा सत्य लोकांसमोर आलं असतं. भारत जर पाकिस्तानसारखा वागला असता, नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं असतं, तर पाकिस्तानी जनतेला भारताचा प्रचंड प्रहार कळला असता. पण सैन्य ठिकाणं असल्यामुळे पाकिस्तानला जगापासून सत्य लपवता आलं.

तर ते तेहरानला झेपणार नाही

युद्धाचे काही नियम असतात, जगातील कुठलही प्रतिष्ठीत सैन्य तसच लढत. भारतीय सैन्य दलांनी सुद्धा आपला तोच लौकीक कायम ठेवला. आता इराण पाकिस्तानसारखा लढतोय, नागरिकांना लक्ष्य करतोय. उद्या इस्रायलने सुद्धा असच केलं, तर ते तेहरानला झेपणार नाही.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.