
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद स्वीकारल्यापासून ते धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह चीनच्या अर्थव्यवस्थेला थेट धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना अपयश आले. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने लावला. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेवर या टॅरिफचा काही परिणाम झाला नाही. उलट भारताने अनेक देशांसोबत व्यापाराची दारे खुली केली आणि थेट मुक्त व्यापार करार केले. नेहमीच भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव बघायला मिळाला. मात्र, या काळात भारताच्या मदतीला चीन धावून आला आणि दोन्ही देशांनी मिळून काही महत्वाचे करार केले. हेच नाही तर भारतावर 50 टक्के अमेरिकेने लावल्यानंतर भारतासाठी चीन मैदानात आला आणि अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली.
अमेरिकेने चीनवर 100 टक्क्यांपेक्षा अधिक टॅरिफ लावण्याची थेट धमकी दिली. पण जेव्हा शी जिनपिंग यांनी अमेरिकेच्या कमकुवत बाजूवर दबाव आणला, त्यावेळी अमेरिकेला एक पाऊस मागे घेत टॅरिफ रद्द करावे लागले. थेटपणे नाही तर अमेरिकेकडून चीनचे नुकसान करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. कोणत्याही प्रकारे चीनच्या अर्थव्यवस्थेला धक्का अमेरिकेला द्यायचा आहे. आता अमेरिकेच्या नाकावर टिचून मोठी कामगिरी चीनने केली आणि मोठा धक्का अमेरिकेला दिला.
गेल्या वर्षी चीनने जगातील इतर देशांकडून खरेदी केलेल्या मालाच्या तुलनेत 108 ट्रिलियन रुपये अधिक किंमतीचा माल विकला. हा आकडा खरोखरच मोठा असून हा आकडा पाहून अमेरिकेची झोप उडाली असेल. अमेरिकेच्या प्रचंड दबावानंतरही चीनने धमाकेदार कामगिरी केली. सीमाशुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, चीनचा जागतिक व्यापार अधिशेष वार्षिक आधारावर 20 टक्क्यांनी वाढला आहे.
3.77 ट्रिलियन डॉलर्सची निर्यात आणि 2.58 ट्रिलियन डॉलर्सची आयात समाविष्ट आहे. 2024 मध्ये 992 अब्ज डॉलर्सचा व्यापार अधिशेष नोंदवला गेला होता. अमेरिकेचा टॅरिफ आणि रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी असलेला दबाव यानंतरही चीनने धमाकेदार कामगिरी केल्याचे येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होताना दिसत आहे.