AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इराण उद्धवस्त होणार, तिचा आत्मा परत आला’; देशात का निर्माण झालीये 16 वर्षांच्या मुलीची दहशत?

इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. याचदरम्यान एक बातमी समोर आली आहे, या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे.

'इराण उद्धवस्त होणार, तिचा आत्मा परत आला'; देशात का निर्माण झालीये 16 वर्षांच्या मुलीची दहशत?
| Updated on: Jun 21, 2025 | 4:30 PM
Share

इस्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, या युद्धामध्ये आतापर्यंत इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मध्यपूर्वेमध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये इस्रायलकडून इराणच्या अणू स्थळांवर तसेच महत्त्वाच्या सैन्य स्थळांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे अनेक भाग उद्ध्वस्त झाले आहेत. दुसरीकडे इराण देखील इस्रायलवर जोरदार हल्ले करत आहे. मात्र या युद्धामध्ये इराणचंच अधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.

हे युद्ध सुरू असतानाच एक अशी बातमी समोर आली आहे, ज्या बातमीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही लोकांकडून असा दावा केला जात आहे की, इराणमध्ये 20 वर्षांपूर्वी एका 16 वर्षांच्या तरुणीला फासावर लटकवण्यात आलं होतं. त्या तरुणीने मरताना इराणला शाप दिला होता. आता याच मुलीचा आत्मा इराणचा बदला घेत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

इराणच्या नेका शहरात 15 ऑगस्ट 2004 ला एक दुर्दैवी घटना घडली होती, या दिवशी इराणमध्ये अतेफा नावाच्या 16 वर्षांच्या तरुणीला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात आली होती, या घटनेमुळे संपूर्ण जगाचं लक्ष इराणकडे वेधलं होतं. आता असं म्हटलं जात आहे की, या तरुणीने मृत्यूपूर्वी इराणला शाप दिला होता, या तरुणीचा आत्मा इराणचा बदला घेत आहे. अतेफासोबत जे घडलं ते फारच वाईट आणि दु:खद आहे.

इराणी अधिकाऱ्यांकडून 16 वर्षांच्या अतेफावर व्याभिचाराला आरोप करण्यात आला होता, इराणमध्ये या अपराधासाठी मृत्यूदंडाची शिक्षा आहे. इराणी मिडिया आणि तेथील सरकारी व्यवस्थेनं या मुलीचं नाव अतेफा सहालेह असल्याचं सांगितलं तसेच या मुलीचं वय 16 वर्ष असताना देखील रेकॉर्डवर 22 वर्ष दाखवण्यात आलं. त्यानंतर या मुलीला सार्वजनिकरित्या फासावर लटकवण्यात आलं. या प्रकरणात तिचं खर वय लपवण्यात आलं.

अतेफाला 15 ऑगस्ट 2004 रोजी पहाटे 6 वाजता फासावर लटकवण्यात आलं, जज हाजी रेजाई यांनी स्वत: तिच्या गळ्यात फास टाकून तिला क्रेनला लटकवलं. यावेळी तिने मृत्यूपूर्वी इराणला शाप दिला होता, हा श्राप आता खरा ठरत असल्याचा दावा केला जात आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....