AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DIWALI in USA: अमेरिकेत लवकरच दिवाळीची सार्वजनिक सुट्टी घोषित होणार; ऐतिहासिक विधेयक सादर होतानाचा बघा VIDEO

न्यूयॉर्कमधील काँग्रेसवुमन कॅरोलिन बी मॅलोनी यांनी बुधवारी जाहीर केले की, दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आहे. मॅलोनी कॅपिटॉल येथे एका कार्यक्रमात म्हणाल्या की, "मला आनंद होत आहे की दिवाळीला एक फेडरल (सार्वजनिक) सुट्टी म्हणून कायद्यात समाविष्ट होईल."

DIWALI in USA: अमेरिकेत लवकरच दिवाळीची सार्वजनिक सुट्टी घोषित होणार; ऐतिहासिक विधेयक सादर होतानाचा बघा VIDEO
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 7:28 AM
Share

वॉशिंग्टनः अमेरिकेत लवकरच दिवाळीची सार्वजनिक सुट्टी घोषित होणार आहे. न्यूयॉर्कमधील काँग्रेसवुमन कॅरोलिन बी मॅलोनी यांनी बुधवारी जाहीर केले की, दिवाळी सणाची सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यासाठी विधेयक सादर करण्यात आले आहे. मॅलोनी कॅपिटॉल येथे एका कार्यक्रमात म्हणाल्या की, “मला आनंद होत आहे की दिवाळीला एक फेडरल (सार्वजनिक) सुट्टी म्हणून कायद्यात समाविष्ट होईल.” या ऐतिहासिक कायद्याला भारतीय-अमेरिकन काँग्रेसच्या राजा कृष्णमूर्ती यांच्यासह अनेक खासदारांनी स्वागत केले आहे. (Diwali to be declared as federal/Public holiday in United states of America resolution submitted)

फॉरेन अफेअर्स हाऊस कमिटीचे अध्यक्ष, सिनीयर काँग्रेसमॅन ग्रेगरी मीक्स यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. “फॉरेन अफेअर्स कमिटी याला पाठिंबा देईल आणि या विधेयकाचा पाठपुरवठा केला जाईल,” असे ते म्हणाले.

कृष्णमूर्ती यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये दिवाळीचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व सांगत एक ठरावही मांडला आहे. कृष्णमूर्ती म्हणाले, दिवाळीची ही फक्त एक फेडरल (सार्वजनिक) सुट्टी नसून भारतीय-अमेरिकन जनतेचे संबंध साजरी करणारे पाऊल ठरेल. “आमेरिकेतील आणि जगभरातील शीख, जैन आणि हिंदूंसाठी दिवाळी हा कृतज्ञतेचा काळ आहे तसेच अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव आहे,” असे कृष्णमूर्ती यांनी ठराव मांडल्यानंतर सांगितले.”दिवाळीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व ओळखण्यासाठी हा द्विपक्षीय ठराव मांडताना मला अभिमान वाटतो,” कृष्णमूर्ती म्हणाले.

Other News

Diwali 2021 | दिवाळीत सुंदर रांगोळी काढायचीय ना?, चिंता सोडा, या 5 डिझाईन बघाच

केंद्राने करुन दाखवलं, आता राज्य सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करणार का ? भाजपचा सवाल

नरेंद्र मोदी 5 नोव्हेंबरला केदारनाथला भेट देणार, श्री शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.