AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

H-1B व्हिसाच्या नव्या नियमातून या लोकांना मोठा दिलासा, ट्रम्प प्रशासनाने जाहीर केली भूमिका, 88 लाख रूपये..

Changes H-1B visa rules : डोनाल्ड ट्रम्प यांच्या धक्कादायक निर्णयाने जग हादरले. पहिल्यांदा टॅरिफचा निर्णय आणि आता थेट H-1B व्हिसाचा निर्णय. मुळात म्हणजे परिस्थिती अशी आहे की, डोनाल्ड ट्रम्प हे कधी काय निर्णय घेतली हे सांगणे कठीण झाले.

H-1B व्हिसाच्या नव्या नियमातून या लोकांना मोठा दिलासा, ट्रम्प प्रशासनाने जाहीर केली भूमिका, 88 लाख रूपये..
Donald Trump
| Updated on: Sep 21, 2025 | 7:31 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प हे एका मागून एक मोठे धक्के भारताला देत आहेत. सुरूवातीला भारतावर त्यांनी तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. टॅरिफमधून भारत मार्ग काढतच असताना त्यांनी भारतीयांना मोठा दणका देत थेट H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाला भरमसाठ फीस लावलीये. काही लोक अमेरिकेत इतका जास्त पैसा देखील कमवत नाहीत, जितका त्यांना व्हिसाची फिस म्हणून द्यायचा आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय लोक संकटात सापडली आहेत. हेच नाही तर अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना या नियमाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत परत लवकर या आणि शक्यतो अमेरिका न सोडण्याचे निर्देश दिली आहेत. H-1B व्हिसाची फीस आता 100,000 डॉलर्स अर्थात 88 लाख रूपये निश्चित करण्यात आलीये.

व्हिसाच्या नियमातील बदलानंतर लोकांमध्ये मोठा संभ्रम बघायला मिळाला. हेच नाही तर भारतात असलेले H-1B व्हिसा धारक आहेत, त्या स्थितीमध्ये थेट अमेरिकेकडे रवाना झाल्याने कारण तशा सूचनाच कंपन्यांनी दिल्या होत्या. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, “हे एकवेळचे शुल्क आहे, वार्षिक शुल्क नाही आणि ते फक्त नवीन लोक H-1B व्हिसासाठी अर्ज करत आहेत, त्यांच्यासाठीच आहे फक्त.

ज्यावेळी 88 लाख रूपये H-1B व्हिसासाठी भरावे लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले, त्यावेळी लोकांमध्ये भितीचे वातावरण बघायला मिळाले. हेच नाही तर सुरूवातीला असेही सांगितले गेले की, 88 लाख प्रत्येक वर्षी भरावे लागतील. आता कॅरोलिन लेविट यांनी स्पष्ट केले की, हे शुल्क व्हिसा लागल्यानंतर एकदाच भरावे लागेल, दरवर्षी नाही. शिवाय ज्या लोकांकडे अगोदरच H-1B व्हिसा आहे, त्यांना देखील हे शुल्क भरण्याची गरज नाही.

H-1B व्हिसा ज्यांच्याकडे आता त्यांच्या नियमात कोणताही बदल करण्यात आला नाही. हा नियम नवीन H-1B व्हिसा धारकांसाठी आहे. मात्र, अमेरिकेने पुन्हा एकदा H-1B व्हिसाच्या माध्यमातून भारताला अत्यंत मोठा धक्का दिला आहे. H-1B व्हिसा हा अमेरिकेत नोकरी करण्यासाठी लागतो. मात्र, अमेरिकेत नोकरी शोधण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीला हा व्हिसा मिळवण्यासाठी 88 लाख रूपये भरणे देखील शक्य नसते.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.