AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिका आणि इस्त्रायलचे बिनसले, थेट इराण युद्धाबाबत होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प..

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता इराण आणि इस्त्रायलमध्ये तणाव वाढल्याचे बघायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका इस्त्रायलला पटत नाही. नुकताच याबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात चर्चा झाली.

अमेरिका आणि इस्त्रायलचे बिनसले, थेट इराण युद्धाबाबत होऊ शकते मोठी घोषणा, डोनाल्ड ट्रम्प..
Donald Trump and Benjamin Netanya
| Updated on: May 21, 2026 | 12:22 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबले पाहिजे, ही जगाची इच्छा आहे. या युद्धाच्या झळा सर्वांनाच बसत आहेत. जर हे युद्ध काही दिवस सुरू राहिले तर भयंकर परिणाम होऊ शकतात. अनेक देशात कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. तेलाचा मोठा तुटवडा बघायला मिळत आहे. ऊर्जेचे संकट आहे. इराणवर हल्ला केला, त्यावेळीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, हे युद्ध फार तर फार 4 आठवडे चालेल. पण तिथेच त्यांचा अंदाजा खोटा ठरला आणि युद्ध 12 आठवड्यांपेक्षाही अधिक काळापासून सुरू आहे. इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्ध थांबवण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत. मात्र, अमेरिका इराण युद्ध थांबण्याकरिता जो निर्णय घेत आहे तो अजिबातच बेंजामिन नेतान्याहू यांना मान्य नाही. यादरम्यानच बेंजामिन नेतान्याहू आणि ट्रम्प यांच्यात मोठे मतभेद झाले. फोनवर काही तास चर्चा झाली आणि तणाव अधिक वाढला.

इस्त्रायलचे म्हणणे आहे की, इराणसोबतचे युद्ध थांबवण्यापूर्वी त्याला जोरदार धक्का दिला पाहिजे. मात्र, याबाबत अमेरिकेची भूमिका दुसरीच आहे. ॲक्सिऑसच्या एका अहवालानुसार, एका सूत्राने सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्यात फोन झाला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांना खूप समजावून सांगूनही ते ऐकते नसल्याने नेतान्याहू अस्वस्थ झाले.

एकीकडे ट्रम्प इराणसोबत करार करून युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे नेतान्याहू इराणवर लष्करी कारवाई करण्याकरिता आग्रही आहेत. इराणच्या पायाभूत सुविधांचे नुकसान व्हावे आणि युद्ध सुरूच राहवे, ही इस्त्रायलची इच्छा आहे. वृत्तानुसार, कतार आणि पाकिस्तानने इतर प्रादेशिक मध्यस्थांसोबत मिळून अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा पुढे जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, प्रश्न एवढाच आहे की, आपण जाऊन हे काम पूर्ण करायचे की इराण या दस्तऐवजावर सही करेल. पाहूया काय होते.. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, अमेरिका आणि इराण करार आणि युद्ध यांच्या जवळ आहे. मला जे पाहिजे तेच नेतन्याहू करतील. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धाची माघार इस्त्रायलला अजिबात मान्य नाही. इराणच्या पायाभूत सुविधा नष्ट व्हाव्यात ही इस्त्रायलची भूमिका आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ